महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST2020-12-08T04:07:59+5:302020-12-08T04:07:59+5:30

कळमेश्वर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळमेश्वर शहरातील विविध संघटनांनी त्यांना अभिवादन केले. रेल्वे स्टेशन चाैक ...

Greetings to Mahamanwala | महामानवाला अभिवादन

महामानवाला अभिवादन

कळमेश्वर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळमेश्वर शहरातील विविध संघटनांनी त्यांना अभिवादन केले. रेल्वे स्टेशन चाैक येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला न. प. उपाध्यक्ष ज्याेत्स्ना मंडपे, शिक्षण सभापती सत्यवान मेश्राम, सरजू मंडपे, नगरसेविका वनिता भलावी, भरत भाेंगाडे यांनी माल्यार्पण केले. तक्षशिला बुद्धविहार ब्राह्मणी येथे महामानवाच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी सूरज मेश्राम, दादाराव सिरसाट, अर्चना ओके, विजय ठाकरे, पिंटू निंबाळकर, पाेलीस पाटील तुकाराम इंगळे, राहुल वानखेडे आदी उपस्थित हाेते. प्रास्ताविक अरुण वाहने यांनी केले. शशिकला चनकापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वैशाली वाहने, बेबी सिरसाट, राजकन्या पाटील, लता खडसे, लता पाटील, नंदा भंडारे उपस्थित होते.

....

आनंद बुद्धविहार नरखेड

नरखेड : येथील आनंद बुद्धविहार येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अनिल गजबे, रत्नाकर मडके, प्रा. कैलास बारमटे, प्रा. हेमंत ढाेके, उदयन बन्साेड, रणजित गजबे, नगरसेवक सुधाकर ढाेक, सुरेश तागडे, भाऊराव गजबे, संगप्रकाश गजबे, गाेलू साेमकुवर, बबन साेमकुवर, दीपक रक्षित आदींची उपस्थिती हाेती.

....

शिवसेनेतर्फे महामानवाला नमन

जलालखेडा : खेडी (खुर्द) येथे शिवसेनेच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना नमन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे, युवासेना तालुकाप्रमुख ललित खंडेलवाल, विभागप्रमुख किसना शेळके, उमेश बनाईत, योगेश राऊत, हरीश मारबते, विक्रम मानकर, कुमार सांगोळे, पुरुषोत्तम ठाकरे, भोयर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahamanwala