महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST2020-12-07T04:05:52+5:302020-12-07T04:05:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ...

Greetings to Mahamanwala | महामानवाला अभिवादन

महामानवाला अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून महामानवाला आदरांजली अर्पण केली.

....

विविध संघटना कामठी

कामठी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जयस्तंभ चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपा अनुसूचित जाती आघाडीच्या वतीने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अजय अग्रवाल, लाला खंडेलवाल, उज्वल रायबोले, सुनील खनवानी, राजेश देशमुख, डाॅ. संदीप कश्यप, नगरसेवक लालसिंग यादव, संध्या रायबोले, प्रतीक पडोळे, पुष्पराज मेश्राम, विक्की बोंबले, बादल कठाणे, राजेश दुबे, पृथ्वीराज दहाट, विजय पाटील, संदीप पोहेकर, सूर्यभान मदनकर, शंकर चवरे, अरविंद चवडे, कमल यादव, सुनील चव्हाण, प्रशांत नगरकर, नीरज यादव, मुकेश बाराहाते, निशा मेश्राम, भारती कनोजे, शशिकला मैंद, प्रियंका चहांदे, रिता कुंभारे, रत्नमाला बोरकर, प्रवीण रामटेके, सतीश कुंभारे, सतीश जैस्वाल, प्रमोद वर्णम, अजय पंचोली, पवन शेंडे, दीपक पाखमोडे आदी उपस्थित होते. नगर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष कृष्णा यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आबीद ताजी, राजकुमार गेडाम, माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर, अंकुश बावनकुळे, नीरज यादव, राजेश कांबळे, मंदा चिमणकर, लक्ष्मण संगेवार, कुसुम खोब्रागडे, विष्णू चनाेले, मंजू मेश्राम, आनंद खोब्रागडे, उबेद कुरेशी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahamanwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.