जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:37+5:302021-01-13T04:20:37+5:30
नागपूर : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त श्रीकांत फडके यांनी ...

जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
नागपूर : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त श्रीकांत फडके यांनी अभिवादन केले. यावेळी उपायुक्त अंकुश केदार, तहसीलदार अरविंद सेलोकर, नायब तहसीलदार संदीप तडसे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सुजाता गंधे, मीनल कळसकर उपस्थित होत्या.
समाजकल्याण विभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी अभिवादन केले. यावेळी सहायक संचालक रमेश कुमरे, सहाय्यक लेखाधिकारी सहारकर, दिनेश कोवे, सुखदेव कौरती उपस्थित होते.