शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

१४ एप्रिलला महामानवाला ‘डिजीटल माध्यमातून’ करणार अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 9:21 AM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबांधवांनी शोधली आहे.

ठळक मुद्देविविध संस्थांनी चालविले उपक्रम

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. या भारत उद्धारकाच्या जयंतीचा उत्साह समाजबांधवांमध्ये असतो. मात्र यावेळी देशावर ओढवलेली परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. अशावेळी मी प्रथम भारतीय व अंतिमत: भारतीय मानणाऱ्या या भारतरत्नाचे अनुयायी ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबांधवांनी शोधली आहे. बाहेर पडण्याऐवजी घरातूनच डिजीटल माध्यमातून महामानवाच्या विचारांचा जागर केला जाणार असून विविध संस्था, संघटनांनी त्यासाठी उपक्रमही चालविले आहेत.दलित, शोषित, वंचित व अस्पृश्य समाजाला ताठ मानेने जगायला लावणारे उद्धारक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटली की समाज बांधवांमध्ये वेगळा उत्साह संचारला असतो. कुठे संविधान मॅरेथान, मेणबत्ती घेउन रॅली तर कुणी वाजतगाजत मिरवणूकी काढतो. नागपूर शहर तर जयंतीच्या उत्साहात रंगलेले असते. दीक्षाभूमी आणि संविधान चौकात तर अनुयायांची अभिवादनासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत रेलचेल चाललेली असते. मात्र यावर्षी नेहमीच्या उत्साहात जयंती सोहळा साजरा करणे शक्य नाही. कोरोना महामारीने जगाला विळख्यात घेतले आहे आणि आपला देशही या संकटाचा सामना करीत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. घरात राहणे व सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे झाले असून सार्वजनिक कार्यक्रम घेणे धोकादायक झाले आहे. अशावेळी घरी राहूनच जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन सर्वच बौद्ध संघटनांनी केले आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाºया आंबेडकरी अनुयायांनीहीही हे निश्चित केले आहे.मात्र विचारांचा जागर तर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे डिजीटल माध्यमांचा उपयोग करून ऑनलाईन जागर करण्यात येत आहे. तसे सोशल माध्यमांचा उदय झाल्यापासून प्रत्येक गोष्ट ऑनलाईन शेअर करणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे. या माध्यमातूनच जयंती सोहळ्याला व्यापक रुप देण्याचा संस्था व संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही संस्थांनी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे ऑनलाईन नियोजन केले आहे.घरी राहून वक्तृत्व स्पर्धा, बुद्ध भीम गीते गायन स्पर्धा, चित्रकला स्पधेर्चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. काव्यवाचन आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रमांचेही ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहे. मात्र जागर करताना उत्सवी रुप येणार नाही, कोरोनाशी लढणाºया आरोग्य सेवक, पोलीस यांचा सन्मान राखला जाईल, याचेही भान राखले जात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांची ही जयंती कधीही नव्हे असा अनुभव ठरेल, असे चित्र निर्माण झाले आहे.- बानाई व आवाज इंडियातर्फे विविध स्पर्धाडॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स (बानाई) आणि आवाज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध-भीम गीते गायन, वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आहे. घरात राहून गायनाचे व भाषणाचे व्हिडीओ तसेच निबंध व चित्रकलेचे व्हिडीओ चॅनेलला ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पधेर्साठी भारताचे राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ. आंबेडकर, राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान आदी विषय देण्यात आले आहेत. यासाठी आकर्षक पुरस्कारही सहभागींना मिळणार आहेत. याशिवाय घरात बसून बुद्ध वंदना व इतर आयोजनांचे प्हिडीओ पाठविण्याचे आवाहनही बानाईतर्फे करण्यात आले आहे. आंबेडकर नाट्य परिषदेतर्फे भाषणांची स्पर्धाआंबेडकर नाट्य परिषदेच्या बॅनरखाली सम्यक थिएटर, फिल्म टेलिव्हिजन अँड थिएटर सोसायटी तसेच बुद्धिस्ट अकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भाषणांची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी व्हिडीओ फित संस्थेच्या सदस्यांचे व्हॉटसअप क्रमांक किंवा इमेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आकर्षक पुरस्कारही देण्यात येणार आहेत. मुक्तवाहिनीतर्फे अभिवादन काव्यगाजमुक्तवाहिनी या कविंच्या संस्थेतर्फे दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान चौक येथे अभिवादन काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे आयोजन ऑनलाईन होत आहे. यातील सहभागी कविंनी त्यांच्या काव्यवाचनाची चित्रफित प्रसेनजित गायकवाड यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन मुक्तवाहिनीचे संयोजक ताराचंद्र खांडेकर व ज्येष्ठ कवी ई. मो. नारनवरे यांनी केले आहे.

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती