महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:04 IST2020-12-07T04:04:52+5:302020-12-07T04:04:52+5:30

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. भाजपाचे प्रदेश सचिव ...

Greetings from BJP on the occasion of Mahaparinirvana Day | महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. भाजपाचे प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, मनपा सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, शहर महामंत्री संजय बंगाले, माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, प्रदेश सचिव सतीश शिरसवान, राजेश हाथीबेड, शहर भाजपा मंत्री ॲड. राहुल झांबरे, भय्याजी बिघाणे, शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, राजू चव्हाण, अजय करोसिया, अतुल सुखदेवे, आनंद अंबादे, सुनील वहाने, अशोक डोंगरे, पारस रगडे, विराग राऊत, जयसिंग कछवाह, प्रभाकर मेश्राम, मार्टिन मोरेश, प्रदीप मेंढे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings from BJP on the occasion of Mahaparinirvana Day