समाजात स्त्री-पुरुष समानतेवर काम करण्यासाठी मोठा वाव ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:27+5:302021-03-09T04:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्त्रिया समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांचे समाजाच्या विकास प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीचे स्थान राहिले आहे. ...

Great scope for gender equality in society () | समाजात स्त्री-पुरुष समानतेवर काम करण्यासाठी मोठा वाव ()

समाजात स्त्री-पुरुष समानतेवर काम करण्यासाठी मोठा वाव ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्त्रिया समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांचे समाजाच्या विकास प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीचे स्थान राहिले आहे. आपण स्त्री-पुरुष समानतेवर बोलत असलो तरी अजूनही मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त आज राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय पाटणकर चौक येथील महिला व बालविकास कार्यालयात सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. सुरेखा बोरकुटे आणि अनघा मोघे उपस्थित होत्या. राज्यात आजपासून राज्य महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली असून, सर्व जिल्ह्यातील पीडित महिलांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने ऐकून घेतल्या जाणार असून, त्यांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. त्यामुळे पीडितांनी न घाबरता आपल्या अडचणी, तक्रारी तसेच गाऱ्हाणी आयोगाकडे मांडण्याचे त्यांनी आवाहन केले.

विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या दृष्टीने महिलांचे समुपदेशन केले जाईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाकडून सुनावणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, या कार्यालयाचे विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी, समुपदेशक व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी किंवा तक्रार करण्यासाठी पीडितांना शासकीय करुणा महिला वसतिगृह, पाटणकर चौक, नारी रोड, नागपूर‍ येथे प्रत्यक्ष संपर्क साधता येईल.

Web Title: Great scope for gender equality in society ()