शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नागपूरनजीकच्या कुवांरा भिवसेनमध्ये व्हावी भव्य फिल्म सिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:44 PM

शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजकांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हवी ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : दुसऱ्या  आॅरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजकांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हवी ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर मनपा, आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, विदर्भ साहित्य संघ, सप्तक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच पुणे फिल्म फाऊंडेशनतर्फे गुरुवारी कवी कुलगुरू कालिदास आॅडिटोरियममध्ये आयोजित दुसºया आॅरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, माजी आमदार आशिष जयस्वाल, मनपा उपायुक्त रवींद्र देवतळे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांना ‘आॅरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड’ तर प्रसिद्ध संगीतकार रामलक्ष्मण यांना ‘आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे सुपरांत सेन, फिल्म गुरु समर नखाते, अमर पाटील, विशाल शिंदे, समीर बेंद्रे, डॉ. रत्नम जे नायर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, मनोरंजनाशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. शारीरिक सुदृतेसाठी मनोरंजन आवश्यक आहे. चित्रपट हे त्यासाठीचे सशक्त माध्यम आहे. डॉ. जब्बार पटेल यांनी आपल्या भाषणात या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. उद्घाटनानंतर पोस्को स्पूर हा पोलंडचा चित्रपट दाखविण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे