शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

दीक्षाभूमी ते संविधान चौक भव्य संविधान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:06 AM

भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संविधानिक हक्क आणि कर्तव्ये याबद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यासोबतच संविधानाची ओळख करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, तसेच विविध संस्था व संघटनांच्या सहकार्याने २६ नोव्हेंबर रोजी भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा२६ तारखेला निघणार भव्य रॅली

आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संविधानिक हक्क आणि कर्तव्ये याबद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यासोबतच संविधानाची ओळख करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, तसेच विविध संस्था व संघटनांच्या सहकार्याने २६ नोव्हेंबर रोजी भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. संविधान सप्ताहानिमित्त जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या  विविध उपक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संविधान दिन तसेच जागृती अभियानाअंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यपालन अधिकारी ए.बी.केदार, सहायक आयुक्त विजय वाकुलकर, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय.आर. सवई, नागपूर विद्यापीठाच्या एनएसएसचे प्रमुख डॉ.अनिल बनकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे, तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.संविधान दिनानिमित्त शहरातील विविध अशासकीय संस्था व संघटना तसेच शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, एनएसएस आदी विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमीते संविधान चौक अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. संविधान चौक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन यामध्ये भारतीय संविधान हे नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारासोबत संविधानाच्या वेगवेगळ्या पैलूबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये पथनाट्य, लेझिम, संविधानाबद्दल संपूर्ण माहिती असलेले फलक, आदींचा समावेश राहणार आहे.संविधान दिनासोबत संविधान सप्ताहानिमित्त संपूर्ण जिल्हाभर तसेच विविध शाळांमध्ये संविधान जागृतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबतच संविधान प्रतिष्ठानतर्फे विशेष पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येईल. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान संविधानातील प्रमुख तरतूद, संविधानाला अभिप्रेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये, संविधानाने दिलेली नागरिकांची कर्तव्ये याबद्दल या सप्ताहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांसाठी संविधान पोस्टर स्पर्धा, संविधान गौरव काव्य स्पर्धा, संविधान घोषवाक्य स्पर्धा, संविधान रॅलीदरम्यान चित्ररथ स्पर्धा, लघुचित्रपट स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धामध्ये जिल्हा परिषद, क्रीडा विभाग, उपसंचालक शिक्षण, राष्ट्रीय सेवायोजना आदींचा सहभाग राहणार आहे.

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉन