शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरच्या मतदानाने गाठला फर्स्ट क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील यंदा विक्रमी मतदान झाले. मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्याहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३४.७० टक्के मतदान झाले होते. यंदा मतदारांची संख्या घटली असली तरी मतदानाची टक्केवारी २९.६८ टक्क्यांनी वाढली.

मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जारी करण्यात आली नव्हती. परंतु मतदानाचा आकडा ५५ टक्क्याहून अधिक असेल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या अपेक्षेहून पुढे जास्त मतदान झाले व मतदानाची अंतिम आकडेवारी ६४.३८ टक्के इतकी होती. एकूण पुरुष मतदारांपैकी ६९.४१ टक्के मतदारांनी मतदान केले, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५६.६२ इतकी होती.

गडचिरोलीत दुप्पट मतदान

मतदानाची सर्वाधिक टक्केवारी भंडारा जिल्ह्यात राहिली. तेथे ७२.५६ टक्के मतदारांनी मतदान केले. त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात ७२.३७ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये गडचिरोलीत ३५.८६ टक्के मतदान झाले होते. मागील वेळच्या तुलनेत यंदा तेथे मतदानाची टक्केवारी दुप्पट आहे. सर्वात कमी ६०.८८ टक्के मतदान नागपूर जिल्ह्यात झाले.

मतदानवाढीची कारणे काय

२०१४ च्या निवडणुकीत २ लाख ८८ हजार ३२३ मतदारांपैकी १ लाख ७३ हजार जणांनी मतदान केले होते. ती टक्केवारी ३४.७० टक्के इतकी होती. यंदा नवीन नोंदणीत मतदारांची संख्या घटून २ लाख ६ हजार ४५४ इतकी झाली. त्यापैकी १ लाख ३२ हजार ९२३ म्हणजेच ६४.३८ टक्के मतदारांनी मतदान केले. यंदा मागील वेळच्या तुलनेत टक्केवारी व आकडा दोन्हीही वाढले. विविध उमेदवार व पक्षांनी यंदा नोंदणी झालेल्या मतदारांशी संपर्कावर जास्त भर दिला होता. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांशी संपर्क सुरू होता. मतदानाच्या दिवशीदेखील त्यांना मतदान केले की नाही याची आठवण करून दिली जात होती. शिवाय सोशल मीडियावरदेखील प्रचार व जागृती दोन्ही सुरू होते. यामुळे यंदा मतदान वाढल्याचे दिसून येत आहे.

उमेदवारांची धाकधूक वाढली

यंदा नव्याने नोंदणी झाली असूनदेखील मतदारांची संख्या घटली. त्यामुळे नेमके किती मतदान होते, याकडे उमेदवारांचे डोळे होते. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. टक्केवारी वाढल्याने चुरसदेखील वाढणार असून, आता निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदानाची टक्केवारी

जिल्हामतदान (२०२०) मतदान (२०१४)

नागपूर ६०.८८ % ३७.४७ %

भंडारा ७२.५६ % ४४.२७ %

गोंदिया ६३.६८ % ४३.७३ %

वर्धा ६५.३२ % २६.२७ %

चंद्रपूर ६७.४७ % ३२.१४ %

गडचिरोली ७२.३७ % ३५.८६ %

एकूण ६४.३८ % ३४.७० %

वर्षनिहाय मतदानाची टक्केवारी

वर्षमतदान

२००८ ५२ %

२०१४ ३४.७० %

२०२० ६४.३८ %