शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

शहीद गोवारी स्मारकावर संतापलेल्या मनाने वाहिली वेदनांची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 9:17 PM

विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी गोवारी शहीद स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देनागपुरात कानाकोपऱ्यातून पोहचले गोवारी बांधवआजही धग कायमच

आॅनलाईन लोकमतनागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ चा तो प्रसंग आजही गोवारी बांधवांच्या अंगावर शहारे आणतो. गोवारी शहीद स्मृतिदिनाला स्मारकावर संतापलेल्या मनाने हे बांधव आपल्या आप्तस्वकीयांना श्रद्धांजली अर्पण करतात, तेव्हा त्यांच्या वेदना अश्रूरूपाने बाहेर पडतात. एका ‘कॉमा’ साठी ११४ गोवारी बांधवांचे रक्त सांडल्यानंतरही २३ वर्षानंतरही जो न्याय त्यांना अपेक्षित आहे, तो मिळाला नाही. ही खंत, चीड, गुरुवारी स्मारकावर आलेल्या गोवारी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून आली. संतापलेल्या मनाने या बांधवांनी वेदनांची फुले शहिदांना अर्पण केली.गोंड व गोवारी यांच्यामध्ये कॉमा लावून गोवारींना अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी हजारो गोवारी बांधवांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मात्र सायंकाळ होता होता मोर्चात सहभागी शेकडो बांधवांचे कुटुंबीय बेचिराख झाले. अचानक उद्भवलेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांनी प्राण गमावला आणि शेकडो जायबंदी झाले. या घटनेला २३ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत हा समाज आजही लढा देतो आहे. या काळ्या स्मृतींच्या आठवणीत दरवर्षी गोवारी समाज नागपुरातील गोवारी शहीद स्मारकावर एकवटतो. गुरुवारी विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो बांधवांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्यांनी चेंगराचेंगरीत आपले आप्त गमावले त्यांना हुंदका आवरणे कठीण झाले होते. अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही येथे श्रद्धांजली अर्पण केली. आदिवासी गोवारींच्या परंपरागत वाद्यासह काही संघटनांनी रॅली काढली. यात मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थ्यांचा समावेश होता. ‘गोवारी शहिदांचा विजय असो, गोवारी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे...’ या घोषणांनी हा परिसर निनादला होता.

टॅग्स :nagpurनागपूर