राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:27 AM2023-06-24T10:27:28+5:302023-06-24T10:28:58+5:30

परतीच्या प्रवासात वर्धा सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देणार आहेत.

Governor Ramesh Bais in Nagpur; Will attend the graduation ceremony of Amravati University | राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

googlenewsNext

नागपूर : राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन झाले. शनिवारी आयोजित अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी ते आले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून शनिवारी ते अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासात वर्धा सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देणार आहेत.

नागपूर येथील राजभवन येथून राज्यपालांचे शनिवारी सकाळी आठ वाजता वाहनाने अमरावतीकडे प्रयाण होईल. सकाळी दहा वाजता अमरावती येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. तेथून स्वामी विवेकानंद सभागृहाकडे ते प्रयाण करतील. सकाळी १०:५० वाजता पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस् परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृह येथे आगमन. स्वामी विवेकानंद सभागृह येथे सकाळी ११ ते १२:४५ दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९व्या पदवीदान सोहळ्यात ते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी १:३० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह येथून सेवाग्रामकडे प्रयाण करतील. 

सेवाग्राम येथे राज्यपाल बैस दुपारी साडेतीन वाजता बापू कुटीला भेट देणार आहेत. एक तास ते या परिसरात असतील. त्यानंतर राजभवन नागपूर येथे त्यांचे आगमन होईल. रात्री साडेआठ वाजताच्या विमानाने ते मुंबईला प्रयाण करणार आहेत.

Web Title: Governor Ramesh Bais in Nagpur; Will attend the graduation ceremony of Amravati University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.