राज्यपाल कोश्यारी यांचा नागपूर दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 10:35 IST2019-11-22T10:32:37+5:302019-11-22T10:35:19+5:30
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दोन दिवसीय नागपूर व विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांचा नागपूर दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दोन दिवसीय नागपूर व विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. रविवार २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.५५ वाजता त्यांचे मुंबईवरुन नागपूर विमानतळावर आगमन होईल, व ते रात्री राजभवनला मुक्काम करतील. सोमवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता यवतमाळ येथील स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. नंतर सायंकाळी मुंबईला रवाना होतील.