राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे नागपुरात आगमन व स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:45 IST2019-08-17T00:43:59+5:302019-08-17T00:45:30+5:30
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे नागपुरात आगमन व स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, महानगर आयुक्त शीतल उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वागताचा स्वीकार करून राजभवनकडे प्रयाण केले.