शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
3
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
5
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
6
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
7
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
8
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
9
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
10
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
11
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
12
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
13
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
14
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
15
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
17
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
18
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
19
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
20
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

शासनाचा सिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 7:45 PM

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या  मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जांवर शासनाने गुरुवारी विविध आक्षेप घेतले.

ठळक मुद्देनागपूर विशेष न्यायालय : मोखाबर्डी योजनेतील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या  मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जांवर शासनाने गुरुवारी विविध आक्षेप घेतले. आरोपींनी अद्याप आत्मसमर्पण केले नसून त्यांना अटकही झालेली नाही. त्यामुळे जामीन अर्ज दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे शासनाने न्यायालयाला सांगितले. शासनाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणावर १५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.आरोपींनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या आरोपींमध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जीगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, मुखत्यारपत्रधारक रमेशकुमार सोनी व गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते यांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या मंगळवारी सदर न्यायालयात या आरोपींसह एकूण १२ आरोपींविरुद्ध ४ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. अन्य आरोपींमध्ये गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता व पूर्वअहर्ता मूल्यांकन समितीचे सदस्य सोपान रामराव सूर्यवंशी, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जीभकाटे, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के व अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर यांचा समावेश आहे. न्यायालयात सरकारतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग