शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा मोठा निर्णय ! जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिक रहिवाशांसाठी ७० टक्के जागा राखीव ; वशिलेबाजी आता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:44 IST

सहकार विभागाचा निर्णय : स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत आता स्थानिक भूमिपुत्रांना मोठी संधी मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, भरती प्रक्रियेतील ७० टक्के जागा स्थानिक रहिवाशांसाठी राखीव असतील.

हा निर्णय सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेलाही लागू होणार आहे. यामुळे स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. सहकार विभागाने हा निर्णय ३१ ऑक्टोबरला घेतला आहे.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार

राज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये होणारी भरतीची लेखी परीक्षा नियुक्त संस्थांद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा संबंधित बँकेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे होणार आहे.

नेतेमंडळी, संचालकांच्या हस्तक्षेपाला आळा

सहकार विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधित जिल्ह्यातील नेतेमंडळी आणि बँकेच्या संचालकांच्या हस्तक्षेपाला आळा बसेल, असे म्हटले जात आहे; परंतु लेखी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ही बँकेचे व्यवस्थापन मंडळच घेणार आहे. त्यामुळे नेतेमंडळी, संचालकांच्या हस्तक्षेपाला आळा बसेल, असे म्हणता येणार नाही.

जाहिरात काढलेल्या बँकांनाही हे निर्णय लागू

सहकार आयुक्तांनी ३१ ऑक्टोबर रोजी घेतलेला निर्णय भरतीची जाहिरात काढलेल्या बँकांनाही निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असल्याचे म्हटले जात आहे.

जिल्ह्यातील बेरोजगारांना मिळणार दिलासा

सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांसाठी ७० टक्के, तर जिल्ह्याच्या बाहेरील रहिवासी उमेदवारांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला. तो सरकारने मंजूर केला. त्यात ७० टक्के जागा स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव राहील. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना दिलासा मिळेल.

जिल्हा सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक

सरकारने प्रस्ताव मंजूर करून जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियेत ७०-३० चे प्रमाण मान्य केले आहे. हे प्रमाण सध्या भरती प्रक्रिया सुरू केलेल्या जिल्हा बँकांसाठीही लागू राहील. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकांमधील भरती प्रक्रिया पारदर्शक होईल.

नोकर भरतीसाठी तीन संस्था नियुक्त

नोकर भरतीसाठी राज्य सरकारने 'आयबीपीएस', 'टीसीएस', 'एमकेसीएल' या तीन संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्था उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेणार आहे. तोंडी परीक्षा घेण्याचा अधिकार मात्र बँकेच्या व्यवस्थापनाकडेच राहील. लेखी आणि तोंडी परीक्षा नियुक्त संस्थेनेच घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

"राज्य सरकारचा निर्णय उत्तम आहे. सरकारने नेमलेल्या संस्थांनीच लेखीसह तोंडी परीक्षा घेऊन थेट पात्र उमेदवारांची यादी बँकांना सोपवावी. आता निर्णयानुसार पात्र संस्था केवळ लेखी परीक्षाच घेणार आहे. तोंडी परीक्षा घेण्याचे अधिकार सध्या बँकेकडेच आहे. प्रक्रिया आणखी पारदर्शक करायची असेल तर तोंडी परीक्षा घेण्याचेही अधिकार बँकांना नसावेत. राज्य सरकारी बँकेत भरतीची लेखी व तोंडी परीक्षा 'आयबीपीएस' राबवीत आहे."- अॅड. विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Reserves 70% District Bank Jobs for Local Residents.

Web Summary : Maharashtra reserves 70% of district bank jobs for locals, impacting ongoing recruitment. Online exams and transparent processes aim to curb influence. Banks with existing ads must comply, benefiting unemployed youth. Experts seek fully independent testing.
टॅग्स :nagpurनागपूरbankबँकGovernmentसरकार