लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनरक्षक व वनपालांच्या समस्याबद्दल वनविभागाला कल्पना आहे. त्यांच्या समस्या सोडविणयासाठी त्या शासन दरबारी मांडल्या जातील, असे आश्वासन अप्पर प्रधान मुुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुयम संवर्ग) विकास गुप्ता यांनी दिले.महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने विकास गुप्ता यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.या बैठकीमध्ये प्रामुख्याने वनरक्षक व वनपालांच्या प्रलंबित वेतनश्रेणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले. पोलीस विभागाच्या धर्तीवर वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ५ टक्के शासन सेवेत आरक्षण देणे, वनशहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी नुकसान भरपाई, वृत्तस्तरावर व विभागीय स्तरावर वनशहीद स्मारक उभारणे, वनरक्षक वनपालांना अतिरिक्त कामाचा कर्तव्यभत्ता, आहार भत्ता, संप कालावधी हा कर्तव्य कालावधी गृहित धरुन संप कालावधीतील वेतन काढणे, वनरक्षक व वनपालांना गस्तीकरिता मोटार सायकलचा पुरवठा, वन्यजीव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर पदाची वेतनश्रेणी, कर्मचाऱ्यांच्या बदली सत्रात समुपदेशनाद्वारे बदली धोरण राबविणे, वनरक्षक पदावरुन वनपाल पदावर पदोन्नतीमध्ये एकसूत्रता, आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी, क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना कॅशलेस हॉस्पिटल योजनेचा लाभ, वन गुन्ह्यात जप्त केलेल्या वनउपज व वाहन सरकारजमा करुन विक्री किमतीमधुन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबाबत बक्षीस देणे आदींसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या मागण्या लक्षात घेता संबधितांना सूचना देण्याचे व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.या बैठकीला वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष माधव मानमोडे, केंद्रीय उपाध्यक्ष विशाल मंत्रीवार, पदाधिकारी अरुण पेंदोरकर, शिवसांब घोडके, भारत मडावी, लहुकांत काकडे, विजय रामटेके, अशोक गेडाम, संतोष जाधव, एस.बी.पुंड, ईश्वर मांडवकर, मनिष निमकर, मारोती पुल्लेवाड, ए.डी.तागड, ईत्यादी वृत्तीय व विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
वनरक्षक व वनपालांच्या समस्या शासन दरबारी सोडवणार : विकास गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:47 IST
वनरक्षक व वनपालांच्या समस्याबद्दल वनविभागाला कल्पना आहे. त्यांच्या समस्या सोडविणयासाठी त्या शासन दरबारी मांडल्या जातील, असे आश्वासन अप्पर प्रधान मुुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुयम संवर्ग) विकास गुप्ता यांनी दिले.
वनरक्षक व वनपालांच्या समस्या शासन दरबारी सोडवणार : विकास गुप्ता
ठळक मुद्देशिष्टमंडळाची भेट : वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेला आश्वासन