शासकीय विज्ञान संस्थेला मिळेल स्वायत्त दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:54+5:302021-02-14T04:09:54+5:30
नागपूर : गेल्या २५ वर्षांपासून स्वायत्तता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात शासकीय विज्ञान संस्थेची प्रतीक्षा संपण्याची ...

शासकीय विज्ञान संस्थेला मिळेल स्वायत्त दर्जा
नागपूर : गेल्या २५ वर्षांपासून स्वायत्तता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात शासकीय विज्ञान संस्थेची प्रतीक्षा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. हा दर्जा देण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) पथकाने संस्थेचा अभ्यास दाैरा पूर्ण केला आहे. शनिवारी पथकाचा दाैरा आटाेपला. काही दिवसांनंतर यूजीसीकडून अहवाल सादर केला जाणार आहे.
विज्ञान संस्थेचे संचालक डाॅ. रामदास आत्राम व उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डाॅ. महेशकुमार साळुंखे यांना या अभ्यास दाैऱ्यामुळे आशा निर्माण झाली आहे. ‘लाेकमत’शी बाेलताना दाेन्ही अधिकाऱ्यांनी यूजीसीच्या पथकाचा दाैरा समाधानकारक झाल्याचे सांगितले. त्यामुळे संस्थेला स्वायत्तता मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर निर्णय कधी हाेइल, हे सध्या गाेपनीय आहे. शक्यताे निर्णय व्हायला एक-दीड महिना लागू शकताे. डाॅ. आत्राम यांनी सांगितले, यूजीसीचे पथक शुक्रवारी पाेहोचले हाेते. दाेन दिवसांपर्यंत विस्तृत अभ्यासदाैरा करण्यात आला. पथकाचे सदस्य समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे संस्थेला स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न हाेत आहेत. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठात अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला हाेता. १० वर्षांपूर्वी यावर पुन्हा पुढाकार घेण्यात आला. दाेन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेत या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली.
- विज्ञान संस्थेला ११३ वर्षांचा वारसा
- २५ वर्षांपासून स्वायत्ततेसाठी प्रयत्न
- अनेक वर्षांपासून विद्यापीठात अडकला हाेता प्रस्ताव
- दाेन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची मंजुरी
- दाेन महिन्यांत शुभवार्ता येण्याची आशा