शासकीय रुग्णालयाची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:26 IST2021-02-20T04:26:07+5:302021-02-20T04:26:07+5:30

रेवराल : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या माैदा तालुका शाखेच्या वतीने माैदा शहरातील ग्रामीण रुग्णालय व परिसरात साफसफाई ...

Government hospital cleaning | शासकीय रुग्णालयाची साफसफाई

शासकीय रुग्णालयाची साफसफाई

रेवराल : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या माैदा तालुका शाखेच्या वतीने माैदा शहरातील ग्रामीण रुग्णालय व परिसरात साफसफाई अभियान राबविण्यात आले. यात इमारती साेबतच परिसरातील गवत व झुडपांची जेसीबीच्या मदतीने साफसफई करण्यात आली. गाेळा झालेल्या संपूर्ण कचऱ्याची वेळीच याेग्य विल्हेवाट लावण्यात आली.

या अभियानात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, तालुका प्रमुख सधुकर हटवार, माजी सरपंच रंजना धनजोडे, युवा सेना शहर प्रमुख जितू साठवणे, नगरसेविका वैशाली मेहर,महिला सेना तालुका प्रमुख नीता पोटफोडे, कामगार सेना तालुका प्रमुख दिगंबर बंगालकर, अक्षय पंचबुद्धे, सुधाकर कानफाडे, मयूर ठाकरे, देवा संतापे, संकेत पांचभुद्धे, अनिकेत झोड, प्रफुल्ल महळे, मोहित बोंबटे, मनीष नेगी, किशोर कानफाडे, दुर्गेश थोटे, प्रदीप पोटफोडे, चेतन गोडबोले, डॉ. आशिष बावणे, प्रीती चौरे, सचिन गाडगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रुग्णालय कर्मचारी सहभागी झाले हाेते.

Web Title: Government hospital cleaning