शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

शासकीय अभियांत्रिकीचे घोडे राजकारणामुळे अडले

By admin | Updated: July 27, 2015 03:28 IST

उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया

नागपूर : उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया निधीअभावी अद्यापही पूर्ण झालेली नाही. असे असतानाच आता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता वर्धा मार्गावरील जागा सुचविली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून उत्तर नागपुरात आलेले महाविद्यालय वर्धा मार्गाकडे जाते की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. परंतु राजकारणाच्या या एकूणच चक्रात विद्यार्थी मात्र हक्काच्या महाविद्यालयाला मुकत आहेत.गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर येथील राजीव गांधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून बाहेर झाले. त्यानंतर उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे ही मागणी जोर धरायला लागली होती. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळायलाच बरीच प्रतीक्षा करावी लागली. प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी कामठी रोड येथील ‘आॅटोमोटिव्ह’ चौकाजवळील मौजा वांजरी परिसरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली. तत्कालीन मंत्री नितीन राऊत यांनी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु त्यानंतर अनेक महिने निघून गेले व सत्ताबदलदेखील झाला. परंतु अद्यापपर्यंत ही जागा तंत्रशिक्षण संचालनालयाला मिळालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे २१.५० कोटी रुपयाचा दर निश्चित केला असून ही रक्कम मागील वर्षी २५ डिसेंबरपर्यंत भरण्यासंदर्भात शासनाला कळविले होते. शिवाय दरवर्षी ५३ लाख रुपयांचीदेखील ‘एनआयटी’ कडून मागणी करण्यात आली. ‘आयआयएम’साठी तात्काळ पावले उचलणाऱ्या राज्य शासनाकडून अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.दरम्यान, रविवारी ‘आयआयएम-एन’च्या उद्घाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन जागेचा मुद्दा काढला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी वर्धा मार्गावरील १० एकरची जागा वापरता येईल. ही जागा आरक्षित असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. जर अगोदरच जागा अंतिम करण्यात आली आहे तर मग नवीन जागेसंदर्भात वक्तव्य राजकीय कारणांतून करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात बावनकुळे तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)