पोलिसांकडे तक्रार होताच खंडणी मागणारे गुंड फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST2021-04-09T04:07:51+5:302021-04-09T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीवे मारण्याचा धाक दाखवून गुंडाने कळमण्यात एका अडत्याला खंडणी मागितली. अडत्याने पोलिसांकडे धाव घेताच ...

पोलिसांकडे तक्रार होताच खंडणी मागणारे गुंड फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवे मारण्याचा धाक दाखवून गुंडाने कळमण्यात एका अडत्याला खंडणी मागितली. अडत्याने पोलिसांकडे धाव घेताच गुंड पळून गेला.
रितिक राजकुमार गौर आणि सौरभ ऊर्फ चिऱ्या गौर (२३) अशी खंडणी मागणाऱ्या गुंडाची नावे आहेत.
फिर्यादी आकाश रामचंद्र गौर (२७) हे गणेशपेठमधील शीतलामाता मंदिराजवळ राहतात. ते कळमणा मार्केटमध्ये अडते आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास आकाश त्यांच्या घरासमोर बसले असताना या भागातील गुंड रितिक आणि सौरभ गौर त्यांच्याजवळ आले. आकाशला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. आकाशने तीव्र विरोध करून फोनवरून पोलिसांना माहिती दिली. बाचाबाचीमुळे बाजूची मंडळीसुद्धा गोळा झाली. त्यामुळे आरोपी पळून गेले. गणेशपेठ पोलिसांनी आकाशच्या तक्रारीवरून आरोपी रितिक आणि सौरभविरुद्ध खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी रितिक हा सराईत गुंड असून त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात यापूर्वीचेही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---