नागपुरात खंडणी वसुलीसाठी गुंडाचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:28 IST2020-05-21T00:23:20+5:302020-05-21T00:28:48+5:30

ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केले.

Goon's chaos for ransom recovery in Nagpur | नागपुरात खंडणी वसुलीसाठी गुंडाचा हैदोस

नागपुरात खंडणी वसुलीसाठी गुंडाचा हैदोस

ठळक मुद्देदुकानदारास मारहाण, आरोपी गुंडास अटक, पिस्तूल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केले.
ठाकूर प्लॉट येथील रहिवासी राजा खान याची ताजाबाद येथे दहशत आहे. बेरोजगारीमुळे परिसरातील अनेक युवक फळ आणि भाजी विकत आहेत. मो. आतिक आणि मो. अहफाज यांनी लॉकडाऊननंतर टरबूजचे दुकान लावले. यानंतर राजा त्याला पाच हजार रुपये मागत होता. पैसे न दिल्यास दुकान लावू न देण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. दुकानातील सामानही फेकले. इतकेच नव्हे तर राजाने अहफाजच्या घरावर हल्ला केला. त्याला व त्याच्या आईला मारहाण केली.
अहफाजचा भाऊ इर्शादने सक्करदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मारहाण, धमकावणे आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यावर पोलिसांना एक पिस्तूल सापडले. ते जप्त करण्यात आले.

Web Title: Goon's chaos for ransom recovery in Nagpur