दरोड्याच्या तयारीतील गुंड जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:27+5:302020-12-06T04:07:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरोड्याच्या तयारीत अंधाऱ्या ठिकाणी दडून बसलेल्या दोन अल्पवयीनांसह चौघांना कपिलनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. नारी ...

Goons arrested in preparation for robbery | दरोड्याच्या तयारीतील गुंड जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील गुंड जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दरोड्याच्या तयारीत अंधाऱ्या ठिकाणी दडून बसलेल्या दोन अल्पवयीनांसह चौघांना कपिलनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

नारी मार्गावर सनसिटी कॉम्प्लेक्सजवळच्या पडक्या घरात काही गुन्हेगार दडून असल्याची माहिती शनिवारी पहाटे ३.२५ च्या सुमारास कपिलनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून हवालदार बंडू कळंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे छापा घातला. यावेळी पोलिसांना आकाश पुरुषोत्तम चिंचखेडे (वय २८), बादल मनोज कोल्हे आणि हनी अन्थोनी तसेच त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार लपून दिसले. पोलीस आल्याचे पाहून आरोपी अन्थोनी पळून गेला तर उर्वरित चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक मोठा चाकू, कुकरी, मिरची पावडर तसेच लाकडी दांडा पोलिसांनी जप्त केला. आरोपींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

---

Web Title: Goons arrested in preparation for robbery