ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... फरार गुन्हेगाराची भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 16:11 IST2021-12-24T15:27:22+5:302021-12-24T16:11:45+5:30

पोलिसांशी लपवाछपवी करणाऱ्या या गुन्हेगाराने फरारीमुळे झालेली आपली दैनावस्था दाखविण्यासाठी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ अपलोड केलाय. " ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... अस तो त्यात म्हणतोय.

goon on the run sends emotional video to nagpur police to gain sympathy has gone viral | ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... फरार गुन्हेगाराची भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल

ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... फरार गुन्हेगाराची भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल

ठळक मुद्देपोलिसांची शोधाशोध

नागपूर : सोशल मीडियावर लोक दररोज काही-ना-काही शेअर करतात. यावेळेच पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी फरार असलेल्या एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या गुन्हेगाराची दशा दर्शीत करणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

सय्यद आसिफ सय्यद निजाम असे या गुंडाचे नाव आहे. तो यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. या गुंडावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. पोलिसांशी लपवाछपवी करणाऱ्या या गुन्हेगाराने फरारीमुळे झालेली आपली दैनावस्था दाखविण्यासाठी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यातून त्याने भावनिक साद घातली आहे.

या व्हिडिओत तो म्हणतो. " ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... " या गुन्हेगाराच्या अंगावर धड कपडे नाही. केस वाढले आहेत. झाडाझुडपात फिरावे लागत असल्याचे या व्हिडिओतून त्याने दाखविले आहे. आसिफचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओला त्याच्या भाऊबंदकीत अर्थात गुन्हेगारी वर्तुळात कशी दाद मिळते, हे तूर्त स्पष्ट नाही. मात्र त्याच्या व्हिडिओची लिंक पकडून त्याला हुडकून काढण्यासाठी पोलिस यंत्रणा कामी लागली आहे.

Web Title: goon on the run sends emotional video to nagpur police to gain sympathy has gone viral