शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अंधाऱ्या ठिकाणी प्रियकरासोबत बसलेल्या मुलीवर गुंडाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:02 IST

निर्जन अंधाऱ्या ठिकाणी बसलेल्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावल्यानंतर एका आरोपीने प्रेयसीवर बलात्कार केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधाशोध करून दोन्ही आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देप्रियकराला मारहाण करून पळवले : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्जन अंधाऱ्या ठिकाणी बसलेल्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावल्यानंतर एका आरोपीने प्रेयसीवर बलात्कार केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधाशोध करून दोन्ही आरोपींना अटक केली.पीडित तरुणी १९ वर्षांची असून ती बी.कॉम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिच्याच वर्गात शिकणाऱ्या समवयस्क तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध आहे. हे दोघे शुक्रवारी हैदराबाद-जबलपूर महामार्गावर फिरायला गेले होते. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यापासून ५० मिटर आतमध्ये एक ले-आऊट आहे. तेथे हे दोघे गप्पा करीत बसले. रात्री १०.४५ च्या सुमारास दोन आरोपी तेथे आले. त्यांनी एवढ्या रात्री निर्जन ठिकाणी अंधारात तुम्ही काय करीत आहा, अशी विचारणा करून त्यांना धाकदपट सुरू केली. एकाने तरुणाला मारहाण करीत रस्त्याला पळवून लावले. तर, दुसऱ्या एका आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. यानंतर आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.दरम्यान, प्रेयसीला दुसरा आरोपी ओढून नेत असल्याचे पाहून प्रियकराला संभाव्य धोक्याची कल्पना आली. त्यामुळे तो धावत पळत रस्त्यालगतच्या एका ढाब्यावर आला. त्याने ढाब्यावर हजर असलेल्यांना या प्रकरणाची माहिती देऊन मदतीची याचना केली. तसेच पोलिसांनाही मदतीसाठी फोन केला. ढाब्यावरील मंडळींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, ते तेथे पोहचण्यापूर्वीच पीडित तरुणी रस्त्याकडे चालत येताना दिसली. तिने आपल्या प्रियकराला घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांचे गस्तीवरील पथक तेथे पोहचले. त्या भागात आरोपींची बरीच शोधाशोध करूनही ते सापडले नाही. त्यामुळे पीडित तरुणी तिच्या प्रियकरासह हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. तेथे तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक पुरभे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती कळताच शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली.हुडकेश्वर पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे पथकही आरोपींची शोधाशोध करू लागले. आज सकाळी गुन्हे शाखेचे एक पथक खरसोली गावात आरोपींना शोधत असताना पीडित तरुणीने सांगितलेल्या वर्णनाचा एक व्यक्ती पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याने आपले नाव अनिल वसंता थेटे (वय ४३) सांगून रात्री केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या बाबा रामदास भगत (वय ३७) नामक आरोपीचेही नाव सांगितले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणले. तेथे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींची चौकशी करून सायंकाळी या दोघांना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.यापूर्वीही केले अनेक गुन्हेआरोपी वसंता थेटे आणि बाबा भगतने ज्या पद्धतीने हा गुन्हा केला, त्यावरून हे दोघे अशा प्रकारच्या गुन्ह्यात सराईत असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. अनेक प्रेमीयुगुल दिवस मावळताच रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जातात. त्यांच्यावर थेटे-भगत सारखे आरोपी पाळत ठेवतात. प्रेमीयुगुलांनी आक्षेपार्ह कृत्याला सुरुवात करताच आरोपी तेथे जातात आणि अत्याचार करतात. बदनामीच्या धाकाने जोडपे पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. त्यामुळे आरोपींचे फावते. तीन वर्षांपूर्वी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात अफरोज टोळीनेही अशाच प्रकारे प्रियकराला मारहाण करून पळवून लावले होते. तर प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केला होता. गेल्या आठवड्यातच या प्रकरणाचा निकाल लागला असून, आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, हे विशेष!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार