प्रश्नांची ‘गुगली’, विभागप्रमुखांची ‘बॅटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:17+5:302021-09-03T04:08:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या परीक्षेची गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ‘नॅक’च्या चमूने ...

'Googly' of questions, 'batting' of department heads | प्रश्नांची ‘गुगली’, विभागप्रमुखांची ‘बॅटिंग’

प्रश्नांची ‘गुगली’, विभागप्रमुखांची ‘बॅटिंग’

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या परीक्षेची गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ‘नॅक’च्या चमूने १२ पदव्युत्तर विभागांना भेट देऊन तेथील पाहणी केली. पहिल्या दिवशीच ‘नॅक’च्या चमूसमोर प्रभावी सादरीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विद्यापीठाच्या सर्वच विभागांना ‘नॅक’च्या चमूने भेट देणे अपेक्षित होते; परंतु वेळेच्या मर्यादेमुळे विद्यापीठाने चांगल्या १२ विभागांची यादी ‘नॅक’ला दिली होती. त्यानुसार सकाळपासूनच चमूने भेटीला सुरुवात केली. वेळ वाचविण्यासाठी चमूतील सदस्य दोन-दोनच्या गटांमध्ये विभागले होते. विभागांमध्ये जाऊन तेथील सुविधांची पाहणी करणे, डिजिटल सादरीकरणाचे अवलोकन करणे तसेच शिक्षकांना विविध प्रश्न विचारणे असा क्रम होता. काही ठिकाणी विभागप्रमुखांना ‘गुगली’ टाकून चमूतील सदस्यांना आश्चर्यचकितदेखील केले. विभागांसोबतच त्यांनी ‘कॅम्पस’मधील स्थितीचादेखील आढावा घेतला.

शुक्रवारी ‘नॅक’चा चमू माजी विद्यार्थी, पीएच.डी. संशोधक इत्यादींशी चर्चा करणार आहे. याशिवाय विद्यापीठातील इतर कार्यालयांनादेखील भेट देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 'Googly' of questions, 'batting' of department heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.