शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 23:22 IST

शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छिबाजार आदी भागाला मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. फूटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तिकारांवरही दंडात्मक कारवाई करून फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देमूर्तिकारांसह दुकानदारांना ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छिबाजार आदी भागाला मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. फूटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तिकारांवरही दंडात्मक कारवाई करून फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त करण्यात आले.कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर गर्दी होणे ही अत्यंत धोकादायक असल्याने तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग झोन क्षेत्रात आकस्मिक दौरा केला. नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर ५ ते १० दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.प्रारंभी आयुक्तांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील फूटपाथवर सामान ठेवणाऱ्या दुकानदाराकडून १० हजाराचा दंड वसूल केला. गोळीबार चौकातील जागनाथ बुधवारी भागात अनेक किराणा दुकानांमध्येही तीच स्थिती दिसून आली. त्यांच्यावरही १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढे मस्कासाथ बंगाली पंजा, इतवारी भागात काही किराणा दुकानांनी फूटपाथवर अतिक्रमण करून सामान ठेवले होते तर काहींनी फूटपाथवरच दुकान मांडले होते. अशा दुकानदारांनाही यापुढे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा देत त्यांच्याकडून ५ व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.दुकानदारांना दिली ताकीदमच्छिबाजार जुने मोटार स्टँड भागात हार्डवेअर विक्रेत्यांनी संपूर्ण साहित्य फूटपाथवर ठेवले होते. आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला बोलवून संपूर्ण साहित्य जप्त केले. या भागातील दोन हार्डवेअर दुकानांचे बरेच सामान फूटपाथवर ठेवले होते. या सामानाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पाईप, लोखंडी साहित्य, ट्रक व बुलडोझरचे टायर, लोखंडी पत्रे आदी साहित्यांवर जप्तीची कारवाई करून अतिक्रमण विरोधी पथकाच्या ट्रकमध्ये टाकण्यात आले. याच भागात चप्पल आणि बुट विक्री करणाऱ्याने थेट फूटपाथवरच दुकान मांडले होते. त्यांनी दंड भरल्याने जप्तीची कारवाई टळली असली तरी यापुढे फूटपाथवर दुकान न लावण्याची सक्त ताकीदही आयुक्तांनी दिली.मूर्तिकाराकडून दंड वसूलचितारओळीत मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. या ठिकाणी आयुक्तांनी मूर्तिकारांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मूर्ती ठेवल्याने अतिक्रमणाच्या कारवाई अंतर्गत सर्व मूर्तिकारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.-तर २५ हजार रुपये दंडशहरात नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करीत सध्या ५ व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांसह दुकाने, आस्थापनांना शिस्त लागावी. नियमांचे पालन व्हावे व रस्ते, फूटपाथ मोकळे राहावेत या उद्देशाने ही कारवाई केली जाते. मात्र दंड भरूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करणे सोडत नाही. यापुढे नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेMarketबाजार