शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गुडबाय २०२०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST

नशेचे इंजेक्शन घेऊन विकृत बनलेल्या एका बॉडी बिल्डरने जन्मदात्या वडिलांची केलेली हत्या, माजी नगरसेवक देवा उसरे हत्याकांड, डॉक्टर महिलेने ...

नशेचे इंजेक्शन घेऊन विकृत बनलेल्या एका बॉडी बिल्डरने जन्मदात्या वडिलांची केलेली हत्या, माजी नगरसेवक देवा उसरे हत्याकांड, डॉक्टर महिलेने व्यसनाधीन नवरा अन् दोन निरागस चिमुकल्यांची केलेली हत्या आणि नंतर स्वत: केलेली आत्महत्या तसेच एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या चिमुकल्या भावासह वृद्ध आजीची हत्या करून आरोपीने केलेली आत्महत्या, प्रेमप्रकरणातूनच घडलेल्या प्रतापनगर, यशोधरानगरातील हत्याकांडही थरार निर्माण करणारे ठरले.

बलात्काराचे १५२ आणि घरफोडीचे ६५८ गुन्हे घडले. लुटमार, चोऱ्या, मारामाऱ्या, प्राणघातक हल्ले या गुन्ह्यांमुळे शहरातील गुंडांची पिलावळ अजूनही वळवळत आहे आणि या पिलावळीला ठेचून काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे, हे अधोरेखित होते. शहरात जीवघेण्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांना अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. रेती माफिया, जुगार अड्डे संचालक, जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगली कारवाई केली. मात्र, या धंद्यातील गब्बर बनलेल्यांना ‘बुकींसारखा’ पॉवरफुल शॉट देणे आवश्यक आहे.

---

ही कीड नष्ट व्हावी

उपराजधानीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यांना ‘साथ’ देणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे देश-विदेशातील वारांगनांची नागपुरात सारखी वर्दळ असते. ड्रग्ज माफियांचाही सुळसुळाट आहे. त्यांनी आपल्या मकडजालात अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ओढले आहे. व्यसनाधीन करून त्यांचे जीवन बरबाद करण्याचे पाप हे समाजकंटक करीत आहेत. समाजाला लागलेली ही कीड नष्ट करण्याची गरज आहे.

----

नव्या वर्षात अपेक्षा

मावळत्या वर्षात काही ब्लॅकमेलरवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, वारंवार भेटीगाठी घेत पोलीस अधिकाऱ्यांच्या कक्षात बसून घसट वाढविणारे, नेते, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्रमात बोलावून सर्वसामान्यांवर इम्प्रेशन बनवणारे आणि नंतर खासगीत आपले खिसे गरम करणारे अनेक समाजकंटक शहरात सक्रिय आहेत. दोन मुखवटे घालून फिरणारे असे अनेक समाजकंटक शहरात सक्रिय आहेत. व्हाईट कॉलर गुन्हेगारांची ते पाठराखण करतात. अनेक प्रकरणात ते मांडवली करतात. पोलीस अधिकाऱ्यांचेही नाव वापरतात. अशांची कुंडली तयार झाल्यास शहरातील कोट्यवधींचे भूखंड हडपणारे भूमाफिया आणि मांडवलीखोरांना चाप बसू शकेल. मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांमुळे नागपूरचे नाव बदनाम झाले आहे. या घोटाळेबाजांमागेही व्हाईट कॉलर समाजकंटक आहेत. यांच्या मुसक्या बांधल्यास हे घोटाळे आणि घोटाळेबाज नागपुरातून कमी होतील. आयुष्यभराची रोख अथवा जमिनीच्या रूपातील कमाई झटक्यात गिळंकृत करणाऱ्या ठगबाजांचा परिणामकारक पद्धतीने बंदोबस्त व्हावा, ही नव्या वर्षाची नागपूरकरांची पोलिसांकडून अपेक्षा आहे.

----