शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गूड न्यूज... रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत

By नरेश डोंगरे | Updated: June 26, 2023 14:15 IST

कोरोना काळात झाली होती बंद : वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू

नागपूर : कोरोना काळात बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांचीतिकिट सवलत त्यांना पुन्हा बहाल केली जाऊ शकते. या संबंधाने अभ्यास समितीने रेल्वे बोर्डाला तशी शिफारस केल्यामुळे सवलतीबाबत उच्च पातळीवर चर्चा चर्वण सुरू असल्याचे समजते.

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना (सिनियर सिटीजन्स) रेल्वे प्रवास भाड्यात ५० टक्के सूट (सवलत) मिळत होती. कोरोना काळात प्रादुर्भावाच्या धोक्यामुळे रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर अनेक निर्बंध आणि बदल करून या गाड्या सुरू झाल्या. अनेकांच्या सवलतीही बंद करण्यात आल्या. नंतर निर्बंध हटविण्यात आले मात्र बंद करण्यात आलेल्या अनेक सवलती सुरूच झाल्या नाही. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात देण्यात येत असलेली ५० टक्क्यांची सुटही बंदच करण्यात आली.

ही सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी म्हणून देशभरात ठिकठिकाणाहून रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यात आले. लेखी-अर्ज विनंत्याही झाल्या. परंतू रेल्वेला कोट्यवधींचा तोटा असल्याचे कारण सांगून सवलत नाकारण्यात आली. दरम्यान, या संबंधाने कोट्यवधी ज्येष्ठ नागरिक नाराज असल्याचा सूर उमटल्याने एक अभ्यास समिती निर्माण करण्यात आली होती. या समितीने ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा ५० टक्के प्रवास भाड्याची सवलत लागू करावी, अशी सूचना केल्याचे समजते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात पुन्हा सवलत लागू होण्याचे संकेत मिळाले आहे. मात्र, या माहितीला कोणत्याही अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असे होऊ शकते, असे मात्र अधिकारी सांगतात.

कुणाला किती टक्के ?

रेल्वेच्या सूत्रांनुसार, रेल्वेत आधी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरुषांना तिकिट भाड्यात ४० टक्के तर ५८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना ५० टक्के प्रवास भाड्याची सवलत मिळत होती.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेSenior Citizenज्येष्ठ नागरिकreservationआरक्षणticketतिकिट