शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गुड न्यूज ! सोन्याचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:09 AM

शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे.

ठळक मुद्दे२० दिवसात हजाराची घसरणखरेदीची हीच संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे. तसेच डॉलरची किंमतही इतर चलनांच्या तुलनेने घसरत होत आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून सोन्याची किंमत घटली आहे. १ मार्च ते २२ मार्चपर्यंत नागपुरात १० ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतीत १,०३५ रुपये तर चांदीत प्रति किलो १४०० रुपयांची घसरण झाली आहे. किमतीत काही दिवस घसरण होईल, पण गुढीपाडव्यानंतर भाव वाढण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.सराफांनी सांगितले की, १ मार्चला १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ३४,११५ रुपये तर चांदी ४१,१३० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर भावात निरंतर घसरण सुरू आहे. २० मार्चला सोने ३३,०६० रुपये आणि चांदी ३९०,७३० रुपयांपर्यंत खाली उतरली होती. होळीनंतर २२ मार्चला सोन्यात २० रुपये तर चांदीत १०० रुपयांची वाढ होऊन भाव अनुक्रमे ३३,०८० तर चांदी ३९८३० रुपयांवर पोहोचली. मार्च महिन्यात फार कमी ग्राहक बाजारात खरेदीसाठी येतात. जेव्हा भाव कमी होतात, तेव्हा ग्राहकांना खरेदीची संधी असते, पण भाव कमी होतात, तेव्हा ग्राहक बाजारात येत नाहीत, याउलट भाव वाढू लागताच ग्राहक बाजारात खरेदीसाठी गर्दी करतात, हा सराफांना नेहमीच येणारा अनुभव आहे. सोन्याची खरेदी नेहमीच शुभ समजली जाते. पारंपरिकरीत्या अनेकांचा गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर असतो. अडचणीच्या काळात सोने मदतीला येते, असा सर्र्वसामान्यांचा समज आहे. भाव वाढल्यामुळे लग्नसमारंभ वा शुभप्रसंगी सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत आहे. सध्या सोन्याच्या भावात होणाऱ्या चढउतारामुळे गुंतवणूकदार सोने खरेदीपासून दूर जात आहेत. भाव उतरल्यामुळे सोने खरेदीची हीच संधी आहे.

भाव आणखी वाढणारगेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत यावर्षी मार्चमध्ये सोन्याचे दर ३ हजारांनी महाग आहेत. गेल्यावर्षी सोने ३० हजारांवर होते. फेब्रुवारीच्या अखेरीस ३४ हजारांवर पोहोचलेले सोन्याचे दर आता ३३ हजारांपर्यंत कमी झाले आहे. अर्थात हजार रुपयांची घसरण झाली आहे. हीच स्थिती मार्च महिन्यात दरवर्षीच असते. कारण या महिन्यात बाजारात खरेदीदार फार कमी असतात. गुढीपाडव्यानंतर लग्नसराईत ग्राहक बाजारात येतील तेव्हा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी आताच सोने खरेदी करावे.- राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.

टॅग्स :Goldसोनं