शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सर्वसामान्यांसाठी खुशखबर; तूर डाळ १५ रुपयांनी उतरली !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 9, 2024 21:22 IST

- हंगामाच्या दरापेक्षा महागच : बाजारात घाऊक खरेदी थांबली, भाव आणखी उतरणार

नागपूर : जून महिन्यात तूर डाळीने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडाली होती. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशखबर असून तूर डाळीचे दर उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची घाऊक खरेदी मंदावली आहे. परिणामी तूर डाळीचे दर पंधरा दिवसातच किलोमागे १२ ते १५ रुपयांनी उतरले असून दर्जानुसार १५२ ते १७२ रुपयात विक्री होत आहे. मात्र, तुलनात्मक आकडेवारी पाहता हे भाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील प्रारंभीच्या हंगामापेक्षा प्रति किलो ३० ते ३२ रुपयांनी जास्तच आहेत. सरकारने कठोर कारवाई करून दरवाढीवर नियंत्रण ठेवावे. नाहीतर डाळीचे भाव पुन्हा २०० रुपयांवर पोहोचतील, अशी व्यापाऱ्यांना भीती आहे. 

जून महिन्यातील तेजीमुळे नागपुरातील अनेक दाल मील आणि घाऊक व्यापाऱ्यांनी तूर डाळ टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीसाठी आणली. त्यामुळे ग्राहकांना जास्त भावात खरेदी करावी लागली. सध्या साठेबाजांकडे हजारो क्विंटल तूर डाळ पडून आहे. आता हेच साठेबाज कमी भावात बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. हरभरा डाळीच्या दरात ६ ते ७ रुपयांची घसरणतूर डाळीसह हरभरा डाळीचे दरही प्रति किलो ६ ते ७ रुपयांनी उतरले असून महिन्याआधीच्या ८२ ते ८८ रुपयांच्या तुलनेत ७५ ते ८१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

किरकोळ दुकानदारांची जास्त भावातच विक्रीतूर डाळ आणि हरभरा डाळीचे भाव सध्या कमी झाल्यानंतरही किरकोळ दुकानदार दोन्ही डाळींची जून महिन्यातील जास्त दरातच विक्री करीत आहेत. ग्राहकांना दरकपातीचा अंदाज नसल्यामुळे ते जास्त दरातच खरेदी करीत आहे. याशिवाय गहू आणि तांदळाचे दरही ६ ते १० रुपये किलोने उतरले आहेत.

डाळींचे सध्याचे दर :डाळ प्रकार एक महिन्याआधीचे दर सध्याचे दरतूर डाळ १६४-१८७ १५२-१७२हरभरा डाळ ८२-८८ ७४-८१

भाव आणखी उतरणारदाल मील, कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे तूर डाळीचा मोठा साठा आहे. बाजारात ग्राहकांचा अभाव आणि सण नसल्यामुळे विक्री कमी झाली आहे. शिवाय यंदा तूरीसह सर्वच कच्च्या मालाचे बंपर उत्पादन होण्याच्या कृषीतज्ज्ञांच्या अंदाजामुळे साठेबाज, मोठ्या कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुढे धान्य आणि कडधान्याचे भाव आणखी कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल.रमेश उमाटे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.

टॅग्स :nagpurनागपूर