नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी : मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसाठी मुंबईमार्गे थेट कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू होणार !

By शुभांगी काळमेघ | Updated: May 28, 2025 17:12 IST2025-05-28T17:09:46+5:302025-05-28T17:12:11+5:30

Nagpur : ही सेवा इंडिगो एअरलाइन्सकडूनच राबवण्यात येणार

Good news for Nagpur residents: Direct connecting flights to Manchester and Amsterdam via Mumbai will start! | नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी : मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसाठी मुंबईमार्गे थेट कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू होणार !

Good news for Nagpur residents: Direct connecting flights to Manchester and Amsterdam via Mumbai will start!

शुभांगी काळमेघ 
नागपूर :
नागपूरकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. आता नागपूरहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसारख्या युरोपियन शहरांमध्ये एका सिंगल पीएनआरवर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने मुंबईमार्गे कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू करण्याची योजना आखली असून ही सेवा १ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.


ही नवीन कनेक्टिंग सेवा नागपूर विमानतळावरून मुंबईमार्गे मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमशी नागपूरला जोडेल. शहरातील विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून या सेवेचा उद्देश नागपूरकरांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ करणे आहे.


प्रवास थोडा दीर्घ पण सोयीस्कर
या प्रवासात मुंबई विमानतळावर ४ ते ५ तासांचा थांबा असणार आहे, मात्र यामुळे वेळेच्या नियोजनात अधिक सुसूत्रता येणार असून नागपूरकरांना थेट पीएनआरवर युरोपियन देशांमध्ये सहज प्रवास करता येईल.


ही सुविधा सुरू झाल्यास नागपूरचे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी नेटवर्क अधिक भक्कम होईल आणि व्यवसाय, शिक्षण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. माहितीनुसार, ही सेवा इंडिगो एअरलाइन्सकडूनच राबवण्यात येणार आहे आणि नागपूर विमानतळावरून नियमित युरोप कनेक्टिव्हिटीसाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

Web Title: Good news for Nagpur residents: Direct connecting flights to Manchester and Amsterdam via Mumbai will start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.