शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:25 IST

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती.

नरेश डोंगरे,नागपूर बिलासपूर-नागपूर-बिलासपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आला आहे. या पार्श्वभूमीवर, वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरातून सर्वात पहिली सुरू होणाऱ्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. प्रारंभी ही गाडी सुसाट होती. मात्र, नंतर या गाडीला प्रवासी मिळेनासे झाले होते. त्यामुळे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर मार्गावर रिकामी ठणठण धावत होती. 

आता मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली असून, वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची खच्चून भरून धावत आहे. या गाडीत बसायला जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तसेच संघटनांकडून या गाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. 

ती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ट्रेन नंबर २०८२५/२६ बिलासपूर-नागपूर-बिलासपूर ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही गाडी ८ कोचसह धावत आहे.

१ जूनपासून होणार सुधारणा

अशा प्रकारे आणखी आठ कोच जोडले जाणार असल्याने ही गाडी १६ कोचची होणार असून, त्यामुळे गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. १ जून २०२५ पासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. त्यासंबंधाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूर