शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
3
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
4
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
5
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
6
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
7
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
8
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
9
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
10
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
11
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
12
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
13
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
14
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
15
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
16
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
17
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
18
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
19
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध
20
खेडकरांचे ‘ते’ सीसीटीव्ही दिखाव्यासाठी; दीड वर्षापासून डीव्हीआरच बसवला नसल्याचा दावा

नागपूर मार्गे एक नवीन अमृत भारत एक्स्प्रेस, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला दिवाळी भेट, नागपूर आणि बल्लारशाह दोन स्थानकांवर थांबे

By नरेश डोंगरे | Updated: October 9, 2025 22:39 IST

Central Railway Amrut Bharat Train: भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेसची एक नवीन ट्रेन आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणार आहे. मुजफ्फरपूर-चारलापल्ली-मुज्जफरपूर ही ती नवीन सुपरफास्ट एक्स्प्रेस असून नागपूर आणि बल्लारशाह या दोन मोठ्या रेल्वे स्थानकावरून तिचे आवागमन होणार आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेसची एक नवीन ट्रेन आता मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातून धावणार आहे. मुजफ्फरपूर-चारलापल्ली-मुज्जफरपूर ही ती नवीन सुपरफास्ट एक्स्प्रेस असून नागपूर आणि बल्लारशाह या दोन मोठ्या रेल्वे स्थानकावरून तिचे आवागमन होणार आहे.

अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत अधिक चांगल्या सोयीसुविधा आणि अतिजलद सेवा देणारी ट्रेन म्हणून अमृत भारत एक्स्प्रेसची ओळख आहे. १५२९४/ १५२९५ क्रमांकाची मुजफ्फूर चारलापल्ली मजफ्फूरपूर ही नवीन सुपरफास्ट ट्रेन १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस प्रवाशांना ही गाडी सेवा देईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी १४ ऑक्टोबरला सकाळी १०:४० वाजता मुजफ्फूरपूर रेल्वे स्थानकावरून प्रवासाला निघेल आणि तब्बल ३८ तासांनंतर ती बुधवारी १५ ऑक्टोबरला रात्री ११:५० वाजता चारलापल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचेल. यावेळी ही गाडी बुधवारी १५ ऑक्टोबरला दुपारी १२:३० वाजता नागपूर स्थानकावर तर सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी बल्लारशाह स्थानकावर पोहोचेल. या दोन्ही स्थानकावर पाच मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर ही गाडी पुढे प्रस्थान करेल.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १५२९५ चारलापल्ली मुजफ्फुरपूर ही ट्रेन चारलापल्ली स्थानकावरून गुरुवारी १६ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि शुक्रवारी १७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मुजफ्फूरपूर स्थानकावर पोहोचेल. या दरम्यान ही गाडी बल्लारशाह स्थानकावर गुरुवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी तर नागपूर स्थानकावर दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. दोन्ही स्थानकावर या गाडीला ५-५ मिनिटांचा थांबा आहे.

महाराष्ट्रासह सहा राज्यांना जोडणारया दोन्ही गाड्यांना प्रत्येकी २२ कोच राहणार असून ही नवीन अमृत भारत एक्स्प्रेस बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोडणार आहे.

ऐन दिवाळीत प्रवाशांना सुविधादिवाळी, छटपूजेनिमित्त नागपूर विभागातून आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. अशा वेळी ही नवीन सुपरफास्ट गाडी सुरू होणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचे होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur gets new Amrit Bharat Express for Diwali; halts at Nagpur, Ballarshah.

Web Summary : Central Railway's Nagpur division receives a Diwali gift: the Amrit Bharat Express. Connecting Muzaffarpur to Charlapalli, it will halt at Nagpur and Ballarshah stations, benefiting travelers to Andhra Pradesh, Telangana, Bihar, and Uttar Pradesh.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेnagpurनागपूर