गोंडवाना विदर्भ राज्याची निर्मिती करावी
By Admin | Updated: December 23, 2014 00:37 IST2014-12-23T00:37:35+5:302014-12-23T00:37:35+5:30
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषावार प्रांताची निर्मिती करताना मध्य भारतातील गोंडवाना प्रदेशात गोंडी भाषिक समुदायाची अवहेलना झाली. महाराष्ट्राच्या विदर्भात गोंडी भाषिक समुदाय मोठ्या प्रमाणात आहे,

गोंडवाना विदर्भ राज्याची निर्मिती करावी
गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी
नागपूर : देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषावार प्रांताची निर्मिती करताना मध्य भारतातील गोंडवाना प्रदेशात गोंडी भाषिक समुदायाची अवहेलना झाली. महाराष्ट्राच्या विदर्भात गोंडी भाषिक समुदाय मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून गोंडवाना विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मुख्य मागणीला घेऊन आदिवासींनी ‘जय सेवा-जय गोंडवाना’चा आवाज बुलंद करीत आज विधानभवनावर धडक दिली.
राज्यभरातून तीन हजारावर आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी भेट दिली. त्यांनी वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्वाही देत, इतर मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मोर्चेकरी ‘जय सेवा, जय गोंडवाना’ लिहिलेल्या पिवळ्या टोप्या घालून सहभागी झाले होते.
नेतृत्व
राजे वासुदेव टेकाम, मधुकर परचाके, प्रा. मधुकर उईके, ज्ञानेश्वर मडावी, निरंजन मसराम, सोमेश्वर नैताम.
मागण्या
गोंडवाना विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी.
शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांची जात प्रमाणपत्राची वैधता तपासावी.
व्यावसायिक व तांत्रिक महाविद्यालयात प्रवेश देताना अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे.
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा
प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी