गोंदिया जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:33+5:302020-12-02T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नागपूर पदवीधर मतदार संघाकरिता मंगळवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ...

गोंदिया जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर पदवीधर मतदार संघाकरिता मंगळवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण २५ मतदान केंद्रावर ६१ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १६,९३४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार होते. यात ११,३३० पुरुष तर ५,६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी प्रथमच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. तर सायंकाळी ५ वाजतानंतरही बऱ्याच केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती. देवरी तालुक्यात ७१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या सावटाखाली ही निवडणूक घेण्यात आल्याने, मतदान केंद्रावर कोराना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.