गोंडेगाव उपसरपंचाच्या हत्येत झाली होती मोठी ‘डीलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 20:37 IST2018-09-05T20:18:41+5:302018-09-05T20:37:53+5:30

कोळसा माफियाने आपला दबदबा बनवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची हत्या केली होती. विनोदच्या हत्येच्या बदल्यात आरोपींना मोठी रक्कम मिळाली होती. विनोदच्या हत्येच्या प्रकरणातील गुन्हेगार राजा बुंदेले याची विचारपूस करताना उपरोक्त बाब उघडकीस आली. गुन्हे शाखा पोलिसांनी राजा आणि त्याचा साथीदार मो. गुलाम मो. वकील सिद्दीकी रा. कन्हान याला पिस्तुल व काडतुसासह अटक केली होती.

Gondegaon Deputy Sarsopancha murder was a big 'Dealing' | गोंडेगाव उपसरपंचाच्या हत्येत झाली होती मोठी ‘डीलिंग’

गोंडेगाव उपसरपंचाच्या हत्येत झाली होती मोठी ‘डीलिंग’

ठळक मुद्देकोळसा माफियाने अगोदरच आखली होती योजना : गुन्हेगार राजा याच्या बयानात खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा माफियाने आपला दबदबा बनवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची हत्या केली होती. विनोदच्या हत्येच्या बदल्यात आरोपींना मोठी रक्कम मिळाली होती. विनोदच्या हत्येच्या प्रकरणातील गुन्हेगार राजा बुंदेले याची विचारपूस करताना उपरोक्त बाब उघडकीस आली. गुन्हे शाखा पोलिसांनी राजा आणि त्याचा साथीदार मो. गुलाम मो. वकील सिद्दीकी रा. कन्हान याला पिस्तुल व काडतुसासह अटक केली होती.
कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची २९ जून रोजी पारशिवनी टोल नाक्याजवळ हत्या करण्यात आली होती. सूत्रानुसार या हत्येचा सूत्रधार सोनू वनवे रा. म्हाळगीनगर हा आहे. सोनू कोळसा तस्करीत सामील आहे. विनोद राजकारणात सक्रिय असल्याने कोळसा व्यापारात त्याचा दबदबा निर्माण झाला होता. सोनूला तस्करी करण्यात अडचण येत होती. त्याचा व्यवसाय ठप्प पडला होता. त्यामुळे विनोद सोनूच्या नजरेत खुपत होता. सोनू कोळसा तस्करी करतांना राजा बुंदेलेसह शहरातील अनेक गुन्हेगारांची मदत घ्यायचा. त्यांच्या मदतीने तो तस्करीच्या मार्गात बाधा निर्माण करणाऱ्यांना धमकावयाचा किंवा त्यांच्यावर हल्ला करायचा. सोनूने राजा व इतर आरोपींना विनोदची हत्या करण्यासाठी तयार केले. या मोबदल्यात त्यांना मोठी रक्कम देण्याचे आश्वासनही दिले. त्याने साथीदारांना सांगितले होते की, विनोद त्याची हत्या करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. घटनेच्या दिवशी २९ जून रोजी सकाळपासूनच आरोपी विनोदवर पाळत ठेवून होते. त्यांना विनोदचा येण्याजाण्याचे अगोरच माहिती होते. योजनेनुसार विनोदची हत्या कल्यावर सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते.
पोलिसांनी विचारपूस केली असता राजाने ग्रामीण भागात कोळशाची सर्रास तस्करी होत असल्याचे सांगितले. त्याच्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या सीमेत एक डझनपेक्षा अधिक कोल माफिया आहेत. येथे दररोज लाखो रुपयांचा कोळशाची तस्करी केली जाते. त्यांचे ग्रामीण पोलिसांसोबतही संगनमत आहे. विनोदच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला नितीन देशमुख नावाचा आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. कोल माफिया हे गुन्हेगार आणि पोलिसांच्या मदतीनेच सक्रिय आहेत. त्यामुळेच राजाचीही सोनूसोबत जुनी मैत्री आहे.

तरीही सक्रिय आहेत कोल माफिया 
विनोद यांच्या हत्येनंतरही ग्रामीण पोलिसांच्या सीमेत कोल माफिया सक्रिय आहेत. खापरखेड्यातील दहेगाव येथे अरविंद, पारशिवनीमध्ये यादव, कन्हानच्या गोडेगावात उमेश आणि उमरेडमध्ये संजय हे पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोळसा तस्करी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उमरेड येथील गँगरेपच्या घटनेतही कोल माफियांना संरक्षण देण्यासाठी वेकोलि व्यवस्थापनाद्वारे घटनास्थळावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना हटविण्यात आल्याचे आरोप लागले होते. दोन्ही घटनांनंतरही कोल माफिया सक्रिय असल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Web Title: Gondegaon Deputy Sarsopancha murder was a big 'Dealing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.