शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकता, विश्वासाच्या बळावर भारतात सुवर्णयुग अवतरेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:02 IST

Nagpur : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली आहे. याच महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीजने एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राचे स्वप्न बघितले आहे. ब्रह्माकुमारीजतर्फे राबविण्यात येत असलेल्या नकारात्मक विचार अभियानातून त्यागून महाराष्ट्राची जनता सकारात्मकतेची कास धरेल. आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून ब्रह्माकुमारीच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

'एकता व विश्वासाने महाराष्ट्राचे स्वर्णयुग' या ब्रह्माकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माउंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी चंद्रिकादीदी, ब्रह्माकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी रजनीदीदी उपस्थित होते. राजयोगिनी रजनीदीदी यांनी प्रास्ताविक केले.

ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव मृत्युंजयभाई यांनी ब्रह्माकुमारीजच्या वतीने महाराष्ट्रात सुरू होत असलेल्या मोहिमेविषयी माहिती दिली. राजयोगिनी चंद्रिकादीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या राज्यव्यापी मोहिमेसाठी ब्रह्माकुमारीजमार्फत आठ सिद्धांत निश्चित करण्यात आले आहेत.

या सिद्धांतातूनच स्वर्णिम युगाचा प्रत्यय बळकट होणार असून, तालुका पातळीवरील ब्रह्माकुमारीजच्या केंद्रांमार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रपतींनी देशात राबविण्यात येणाऱ्या 'एक भारत श्रेष्ठ भारत', 'डिजिटल इंडिया' व देशात पायाभूत सुविधांचे निर्माण होणारे जाळे यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये विकसित भारत घडविण्याचा विश्वास निर्माण होत असल्याचे नमूद केले.

प्रगतीसाठी एकता आणि विश्वास महत्त्वाचा : राज्यपाल देवव्रत

ज्या भूमीत एकता आणि विश्वास आहे, त्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ब्रह्माकुमारीचे कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे आहे. एकता हाच शांतीचा मंत्र आहे आणि विश्वास असेल तरच एकता निर्माण होते. वेद हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. प्रेमामुळेच जगात शांती व समृद्धी नांदू शकते, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले.

जागृत समाजामुळेच कल्याणकारी कार्यक्रमांना बळ : बावनकुळे

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जागृत समाज हा शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांना बळ देतो. हाच संदेश पुढे नेत एकता व विश्वासावर आधारित ब्रह्माकुमारीजचे अभियान हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मानवतेला पुढे नेणारा हा उपक्रम विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unity, Trust Will Usher Golden Era in India: President Murmu

Web Summary : President Murmu launched Brahma Kumaris' campaign, emphasizing unity and faith for a golden Maharashtra and India. She highlighted the state's influential figures and ongoing national initiatives, echoing Governor Devvrat's sentiment that unity fosters progress. Minister Bawankule stressed the campaign's role in Maharashtra's socio-spiritual advancement.
टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूnagpurनागपूरEducationशिक्षण