सोने ३० हजारावर, गहू स्थिर, तांदळात वाढ

By Admin | Updated: May 12, 2014 00:31 IST2014-05-12T00:31:04+5:302014-05-12T00:31:04+5:30

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीयस्तरावर सोन्यातील मंदीचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. सोने तोळ्यामागे २५० रुपये तर चांदीत किलोमागे ११०० रुपयांची घसरण झाली.

Gold 30 thousand, wheat steady, increase in rice | सोने ३० हजारावर, गहू स्थिर, तांदळात वाढ

सोने ३० हजारावर, गहू स्थिर, तांदळात वाढ

नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीयस्तरावर सोन्यातील मंदीचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. सोने तोळ्यामागे २५० रुपये तर चांदीत किलोमागे ११०० रुपयांची घसरण झाली. सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतरही सोन्याच्या दरावर परिणाम होण्याची काहीही चिन्हे नसून, दर कमी होण्याची शक्यता सराफा व्यापार्‍यांनी नाकारली आहे. सराफा बाजारात सोने शनिवारी ३०,३०० रुपयांवर स्थिरावले. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी कमी असल्याने अखेरच्या दोन दिवसात चांदीत ५०० रुपयांची घट होऊन ४२,६०० रुपयांवर स्थिरावली. किमती स्थिरावल्यानंतरही सराफा बाजारात सोन्याला फारशी मागणी नाही. अनिश्चित भावामुळे सराफांनी सध्या खरेदी थांबविली आहे. सोमवारी प्रति तोळा सोने २५ रुपयांनी वाढून ३०,६५० रुपयांवर स्थिरावले. मंगळवारी ६५ रुपयांची घट झाली तर बुधवार, ७ मे रोजी २५ रुपयांची घसरण झाली. या दिवशी भावपातळी ३०,५६० रुपयांवर स्थिरावली. गुरुवारी २३५ रुपयांनी भाव कमी झाले. शनिवारी बंद होतेवेळी सोन्याचे दर ३०,३०० रुपयांवर पोहोचले तर चांदी ४२,६०० रुपयांवर स्थिरावली. गहू व तूर डाळ स्थिर, तांदळात वाढ गेल्या आठवड्यात धान्यबाजारात ग्राहकांचा अभाव असल्याने व्यापार्‍यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. केंद्रात कोणते सरकार येईल, यावर बाजारात दरदिवशी चर्चा रंगत आहे. पुढील आठवड्यात स्थिती स्पष्ट होईल गहू, चणा, तूर डाळ स्थिर तर तांदळात वाढ झाली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान येथून गव्हाची आवक वाढल्याने उत्तम प्रतिच्या गव्हाचे भाव उच्चांकावरच होते. मात्र काळे डाग असलेल्या गव्हाला उठाव नसल्याने दर कमी होते, असे मत धान्यबाजाराचे समीक्षक प्रताप मोटवानी यांनी व्यक्त केले. गेल्या काही आठवड्यापासून पावसाचे वातावरण असल्याने बाजारात चणा मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्याने भाव उतरले. कणकी तांदळाला मागणी असल्याने भाव वधारले. मूग आणि उडद डाळीत थोडीशी सुधारणा दिसून आली. आयात कमी झाल्याने उडदमोगरमध्ये तेजीचे वातावरण होते. विदर्भातील गावरानी तूर, कर्नाटकी आणि मुंंबईत आयातीत तुरीचे भाव थोडेसे वधारले. उन्हाळ्यात उत्पादन होणार्‍या नवीन बारीक मूगाचे दर क्विंटलमागे ४०० ते ४५० रुपये वधारले. इतवारी ठोक बाजारात धान्य आणि कडधान्याचे भाव खालीप्रमाणे होते. गहू मिल क्वालिटी १७००-१७५०, लोकवन मध्यम १८५०-२०००, लोकवन सुपर बेस्ट २१००-२४००, एमपी बोट बेस्ट २८००-३५००, मध्यम २२००-२६५०, तांदूळ स्वर्णा नवीन २४००-२४५०, जुना २७५०-२८५०, बीपीटी नवीन २७००-३०००, जुना ३२००-३६००, एचएमटी नवीन ३९००-४२००, जुना ४४००-४८००, श्रीराम नवीन ४२००-५०००, जुना ५२००-५६००, चिन्नोर नवीन ५०००-५६००, जुना ५८००-६०००, बासमती (दर्जानुसार) ६०००-१३५००, कणकी १८००-३३५०, पोहे पातळ २६००-३३५०, पोहे जाड २५००-३३७५, दालिया ४२००-४८५०. चणा गावरानी २६५०-२७००, फिल्टर चना ३२००-३४००, चणा दाळ मिल क्वालिटी ३३००-३४५०, मध्यम ३५००-३६५०, सुपर बेस्ट ३७५०-४०००, तूर गावरानी ४४५०-४५५०, तूर कर्नाटक ४६००, तूर आयातीत (मुंबई) ४४००, तूर डाळ (दर्जानुसार) ५६००-६७००, मसूर डाळ (दर्जानुसार) ६००० ते ६२००, मूग मोगर ९५००-११०००, मूग डाळ ८५००-९६००, उडदमोगर ६२००-८२००, लाखोळी डाळ २९५०-३१५०, बटरी डाळ ४०००-५०००, वाटाणा डाळ ३४५०-३५०० मूग चमकी ८५००-९२००. (प्रतिनिधी)

Web Title: Gold 30 thousand, wheat steady, increase in rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.