बकऱ्या चाेरणाऱ्या चाैघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:13+5:302021-05-11T04:09:13+5:30
कन्हान : घरासमाेर बांधलेल्या बकऱ्या चाेरून नेणाऱ्या चाैघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात आली. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) ...

बकऱ्या चाेरणाऱ्या चाैघांना अटक
कन्हान : घरासमाेर बांधलेल्या बकऱ्या चाेरून नेणाऱ्या चाैघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात आली. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरी (राणी) येथे रविवारी (दि. ९) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
प्रवीण मधुकर भाेयर (३५), अश्विन रामराव वाघमारे (२९), दुर्याेधन माणिकराव उके (२८ तिघेही रा. बाेरी राणी, ता. पारशिवनी) व देवराव शंकर बागळे (२७, रा. कांद्री, ता. पारशिवनी) अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. बंडू गाेपिचंद कावळे (४०, रा. बाेरी राणी) यांनी त्यांच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे घरासमाेर बांधून ठेवल्या हाेत्या. या चाैघांनीही त्यातील एक बाेकड चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच बंडू कावळे यांनी शेजाऱ्यांना सांगितले. नारगरिकांनी लगेच गावाच्या परिसरात शाेध घेतला असता, त्यांना चाैघेही बाेकड घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना देत चाैघांना पकडले आणि पाेलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.