शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

१ मे पूर्वी विदर्भ द्या !

By admin | Updated: April 12, 2015 02:35 IST

केंद्रात सत्ता आल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे तोंडी आणि लेखी आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिले होते.

नागपूर : केंद्रात सत्ता आल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे तोंडी आणि लेखी आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. परंतु राज्यात आणि केंद्र शासनात सत्ता येऊनही आश्वासन देणारे आपल्या आश्वासनावरून मागे फिरत आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी विदर्भ राज्याची घोषणा न केल्यास विदर्भभर १ मे रोजी पोकळ आश्वासन देणाऱ्या नेत्यांचे पुतळे दहन आंदोलन राबविण्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक आमदार निवास सभागृहात आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. बैठकीला समितीचे नागपूर शहर अध्यक्ष दिलीप नरवडिया, प्रबीर कुमार चक्रवर्ती, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केंद्र शासन प्रत्येक निर्णय तातडीने घेत असल्याचे सांगून वेगळ््या विदर्भाबाबत मौन का पाळल्या जाते, असा सवाल उपस्थित केला. पंतप्रधानांनीही विदर्भाचे तुकडे होऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना वक्तव्य केले. त्यामुळे पोकळ आश्वासन देणाऱ्या नेत्यांचे विदर्भाच्या सर्व जिल्हा आणि तालुक्यात पुतळे दहन करण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. माजी पोलीस महासंचालक प्रबीर कुमार चक्रवर्ती यांनी नेत्यांचे पुतळे जाळून दबाव वाढविण्याचे आवाहन बैठकीत केले. त्यासाठी १५ ते २२ एप्रिल दरम्यान समितीचे जिल्हाप्रमुख, प्रमुख कार्यकर्ते तालुकास्तरावर जाऊन स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागृती अभियान राबविणार आहेत. त्यात सभा, कार्यकर्ता बैठक, संघटनात्मक बांधणी करून १ मे रोजीच्या पुतळा दहन आंदोलनाची माहिती देण्यात येणार आहे. प्रास्ताविक समितीचे नागपूर शहर अध्यक्ष दिलीप नरवडिया यांनी केले. बैठकीला अरुण केदार, शाम वाघ, अरविंद भोसले, अरुण मुनघाटे, अमिता मडावी, रमेश भुरसे, प्रकाश पांडे, राजेश श्रीवास्तव, प्रदीप धामणकर, राजेंद्र आगरकर, रफिक रंगरेज, प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रभाकर दिवे, दिलीप कोहळे, किशोर पोतनवार, अ‍ॅड पद्माकर टेंभुर्णेकर, निखील गवळी, तुषार हटवार, अण्णाजी राजेधर, गणेश शर्मा, दत्तुजी भेंडे, सुनील खंडेलवाल, प्रा. सतीश मोहिते, दिवाकर माणूसमारे, दत्ता तांदुळे, दीपक मुंडे, आर. एम. पटेल, प्रदीप देशपांडे आणि विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)