मनपाला अप्राप्त ३८५ कोटीचा निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:41 IST2020-06-08T19:40:08+5:302020-06-08T19:41:49+5:30
नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मनपाला अप्राप्त ३८५ कोटीचा निधी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सोमवारी झलके यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे उपस्थित होते.
मनपाला २०१९-२० या वर्षात विविध लेखाशीर्ष अंतर्गत २९९.७० कोटी अप्राप्त आहेत. मनपाला जीएसटी अनुदान स्वरूपात दर महिन्याला ९३.०५ कोटी मिळत होते. मात्र एपिल महिन्यापासून ५० कोटी अनुदान मिळत आहे. जीएसटी अनुदानाचे अप्राप्त ८६.१० कोटी असे एकूण ३८५.७७ कोटी उपलब्ध करावेत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.