शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:47 IST

कोरोनाच्या काळात आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणाचे ३०० रुपये देऊन इतर सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकात सोमवारी आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या काळात आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणाचे ३०० रुपये देऊन इतर सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकात सोमवारी आंदोलन केले.माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना पुर्ण करण्याची जबाबदारी आशा वर्कर्सवर येऊन ठेपली आहे. आशा वर्करसोबत आरोग्य कर्मचारी, स्वयंसेविका, स्वयंसेवक ठेवण्याची जबाबदारी आहे. आशा वर्करवर संपूर्ण कामाचा भार टाकण्यात येत आहे. शहरी भागात एएनएम, सुपरवायझर, महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना राजीनामा द्या किंवा काढून टाकण्याची अन्यथा मृत्यूनंतर ५० लाख मिळणार असल्याची भाषा वापरण्यात येत आहे. सोबतच सॅनिटायझर, मोजे, मास्क, कॅप, प्रिंटेड टी शर्ट, अ‍ॅप्रन कालावधी संपूनही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. २२ मार्चपासून कोरोनासाठी काम करणाऱ्या आशा वर्करला आणि डाटा एन्ट्री करणाऱ्या गटप्रवर्तकांना काम करूनही कोणताही मोबदला महापालिका किंवा जिल्हा परिषदेने दिला नाही. इतर जिल्ह्यात २०० ते ३५० रुपये प्रति रोज आशा वर्करला देण्यात येत आहेत. ५ ऑक्टोबरपासून योग्य निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, नंदा लिखार, रूपलता बोंबले, अंजू चोपडे, मनीषा बारस्कर, मंदा गंधारे उपस्थित होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनWomenमहिलाEmployeeकर्मचारी