गरजूंना स्थायी पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST2020-12-29T04:08:58+5:302020-12-29T04:08:58+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : परिसरातील नझुलच्या जागेवर घरे बांधून नागरिक वास्तव्यास आहेत. त्या गरजू नागरिकांना स्थायी पट्टे देण्यात ...

Give permanent leases to the needy | गरजूंना स्थायी पट्टे द्या

गरजूंना स्थायी पट्टे द्या

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : परिसरातील नझुलच्या जागेवर घरे बांधून नागरिक वास्तव्यास आहेत. त्या गरजू नागरिकांना स्थायी पट्टे देण्यात यावे तसेच २५ ते ३० वर्षांपासून लीज भाडेपट्टीवर नागरिक घरे बांधून राहतात. त्यांना लीज वाढवून देण्याची मागणी नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रमा गजभिये यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांना निवेदन साेपविले आहे.

कामठी नगर परिषदेतर्गत विविध भागात नझुलच्या जागेवर नागरिक घरे बांधून अनेक वर्षांपासून राहतात. त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे साेबतच नझुलच्या जागेवर लीज भाडेपट्टीवर सुमारे ३० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना लीज वाढवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या दाेन्ही मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा आंदाेलनाचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनाची प्रत खा. कृपाल तुमाने व आ. टेकचंद सावरकर यांना दिली आहे.

Web Title: Give permanent leases to the needy