शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

एक कोटी द्या, अन्यथा मुलांचे अपहरण करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:07 IST

नागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविण्याचा गंभीर ...

नागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा बेलतरोडी पोलिसांनी तपास करून पाच दिवसात छडा लावला. फॅशन डिझायनर असलेल्या शीतल वसंत इटनकर (४५,शिल्पा सोसायटी) या महिलेला अटक केली आहे.

शीतलचा पती एका शासकीय विभागात अभियंता पदावर कार्यरत आहे. त्याला दीड लाख रुपये वेतन मिळते. त्यांनी ५० लाख रुपयांचे कर्ज घेऊन घर बांधले. दर महिन्याला ६० हजार रुपयांची किस्त जाते. उर्वारित पैशात घरखर्च भागत नाही. यामुळे फॅशन डिझायनर असलेल्या शीतलला बुटिक सुरू करायचे होते. पतीने पैसे न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला होता. सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. डॉ. पांडे यांच्या पत्नीदेखील चिकित्सक आहेत. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता. त्यांना दोन मुले असल्याचे फेसबूक अकाऊंटवरून तिने शोधले होते. त्या मुलांचे अपहरण करून रक्कम उकळण्याची योजना तिने आखली.

ही योजना अमलात आणण्यासाठी १० जूनला कुरिअरच्या माध्यमातून धमकीपत्र पाठविले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ते डॉ. पांडे यांना मिळाले. पत्रात दोन्ही मुलांचे अपहरण करण्याची धमकी देऊन प्रत्येकांच्या बदल्यात ५०-५० लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम १७ जूनच्या पहाटे नरेंद्र नगरातील एका निर्जन ठिकाणी ठेवण्याची सूचना देऊन असे न केल्यास मुलांची हत्या करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर, पोलिसांना कळविल्यास गंभीर परिणाम होतील, असाही इशारा दिला होता.

या पत्रामुळे डॉ. पांडे यांनी ११ जूनलाच बेलतरोडी पोलिसात तक्रार नोंदविली. याच दिवशी १५ वर्षाच्या राज पांडे या मुलाची हत्या झाल्याने पोलीस यंत्रणा सावध झाली. पत्राचा धागा पकडून पोलिसांनी शोध सुरू केला. ओंकार नगरातील एका कुरिअर सेंटरवरून ते पाठविण्यात आले होते. १० जूनला कुरिअरमधून पाठविण्यात आलेल्या सर्व ग्राहकांचे पत्ते मिळवून पोलिसांनी प्रत्येक ग्राहकांकडे चौकशी केली. शीतलने नाव आणि पत्ता खोटा दिल्याने पोलीस तिच्यापर्यंत पोहचू शकले नाही. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीत मोपेडवरील एक महिला संशयास्पद स्थितीत दिसली. तिचा शोध घेत पोलीस रामटेके नगरात पोहचले. मोपेडच्या क्रमांकावरून या महिलेचे नाव पोलिसांनी मिळविले. रामटेके नगर आणि रक्कम ठेवण्यास सुचविलेल्या नरेंद्र नगराच्या मध्ये शीतलचे घर आहे. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलीस निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिसांनी बुधवारी सकाळी शितलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्हा कबूल केला. कुरिअर दुकानदाराने आणि डॉ. पांडे यांनीही तिला उपचारासाठी आली असल्याचे ओळखले. आधी तर तिच्या कृतीवर कुणाचाही विश्वास नव्हता. तिच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर पती आणि मुलींनीही प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. ही कारवाई डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय आकोत, पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया, हवलदार तेजराम देवले, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, शैलेश बडोदेकर, मिलिंद पटले, वंदना लोटे, गोपाल देशमुख, कमलेश, बजरंग, नितीन, प्रशांत, राजेंद्र, कुणाल, दीपक, मिथुन यांनी पार पाडली.

...

अति महत्वाकांक्षा ठरली घातक

पतीच्या वेतनातून मुलींचे शिक्षण आणि घरखर्च सहज करता आला असता. मात्र स्वत:चे बुटिक सुरू करून शीतल बिझनेस वूमन होऊ इच्छित होती. या अतिमहत्वाकांक्षेपोटी तिने गुन्ह्याचा अविचारी मार्ग स्वीकारला. पत्रामुळे घाबरून पांडे दाम्पत्य सहजपणे रक्कम देण्यास तयार होतील, असा तिला विश्वास होता.

...

ती पहायची वेब सिरीज !

शीतलला वेब सिरीज पहाण्याचे प्रचंड वेड आहे. यातूनच तिने ही योजना आखली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र ती हे नाकारते. कोणत्याही परिस्थितीत पैसा मिळवायचा, हे तिने ठरविले होते. पैशासाठी ती प्रचंड तणावात असल्याने कुटुंबीय तिच्यावर उपचारही करणार होते. तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळवून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

...