लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने मंदिर परिसरातील १२ भाडेकरू दुकानदारांविरुद्ध दाखल केलेले दावे सहा महिन्यांत निकाली काढा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दिवाणी न्यायालयाला दिला आहे.
भक्तांच्या सोयीकरिता मंदिर परिसर स्वच्छ व प्रशस्त करण्यासाठी संस्थानला संबंधित दुकानांची जागा हवी आहे. त्यामुळे संस्थानने दुकाने रिकामी करून घेण्यासाठी २०१६ मध्ये दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत.
दरम्यान, या दाव्यांमध्ये पुरावे नोंदणी सुरू असताना दुकानदारांनी विविध कारणांसाठी दोन अर्ज दाखल केले होते. ते अर्ज दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावले. परिणामी, दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता दुकानदारांच्या सर्व याचिका नामंजूर करून वरील आदेश दिला. संस्थानतर्फे अॅड. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले.
Web Summary : The High Court ordered a civil court to decide cases filed by Shegaon's Gajanan Maharaj Sansthan against twelve shopkeepers within six months. The Sansthan seeks the shop space for devotee convenience, having filed lawsuits in 2016. The court rejected shopkeepers' petitions, upholding the directive.
Web Summary : उच्च न्यायालय ने शेगांव के गजानन महाराज संस्थान द्वारा बारह दुकानदारों के खिलाफ दायर मामलों पर छह महीने के भीतर फैसला देने का दीवानी अदालत को आदेश दिया। संस्थान को भक्तों की सुविधा के लिए दुकान की जगह चाहिए, जिसके लिए 2016 में मुकदमे दायर किए गए थे। अदालत ने दुकानदारों की याचिकाएं खारिज कर दीं, और निर्देश को बरकरार रखा।