शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

गिरणार सोसायटीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:15 IST

suicide case, Nagpur News गिरणार सोसायटीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोटाच्या व्याधीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून नंदनवन पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

ठळक मुद्देघरीच लावला गळफास : नंदनवन पोलिसांकडून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिरणार सोसायटीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोटाच्या व्याधीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून नंदनवन पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.रोशन पांडुरंगजी लाडेकर (वय ३१) असे मृताचे नाव आहे . तो नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना बगडगंज, कुंभार टोली परिसरात राहत होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे रोशन तयार झाला. घरी नाश्ता केल्यानंतर त्याने ७ वाजता आपल्या बेडरूममध्ये जाऊन आराम करतो, असे घरच्यांना सांगितले. ९ वाजले तरी तो खाली उतरला नाही. त्यामुळे रोशनचा भाऊ राकेश त्याच्या रूममध्ये गेला. आतून दार लावून होते. राकेशने खिडकीतून बघितले असता रोशन गळफास लावून दिसला. त्याने आरडाओरड करून आजूबाजूची मंडळी गोळा केली. त्यानंतर आ. खोपडे यांना माहिती दिली. खोपडे यांची ही पतसंस्था आहे. रोशन हा माजी नगरसेवक अनिल धावडे यांचा भाचा आहे. त्यामुळे धावडे समर्थकही मोठ्या संख्येत रोशनच्या घरी धावले. माहिती कळताच नंदनवन पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी रोशनचा मृतदेह मेडिकलमध्ये नेला. या संबंधाने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. रोशनला अनेक दिवसांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास होता. दोन दिवसापूर्वीच रहाटे हॉस्पिटलमधून तो उपचार घेऊन परतला होता. या संबंधाने आमदार खोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रोशन आपल्या गिरणार सोसायटीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचे सांगून पोटदुखीच्या व्याधीमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा घरच्यांचा अंदाज असल्याचे सांगितले.दोन वर्षांपूर्वीच झाले लग्नरोशनचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला एक छोटी मुलगी असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर