शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

‘फेक आयडी’द्वारे मुलींना ओढले जातेय जाळ्यात; पंजाबमध्ये सापडली नागपुरातील मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 11:16 IST

सोशल मीडियावर मानव तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे. ते ‘फेक आयडी’ तयार करून अल्पवयीन मुलींना हिरोईन बनविण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. शहरातील एक उच्चभ्रू कुटुंबातील अल्पवयीन विद्यार्थिनीसुद्धा या टोळीच्या जाळ्यात अडकली.

ठळक मुद्देमानव तस्करी टोळी सक्रिय  

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर मानव तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे. ते ‘फेक आयडी’ तयार करून अल्पवयीन मुलींना हिरोईन बनविण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. शहरातील एक उच्चभ्रू कुटुंबातील अल्पवयीन विद्यार्थिनीसुद्धा या टोळीच्या जाळ्यात अडकली. मुलगी बेपत्ता होताच आईवडिलांनी तत्परता दाखविल्याने तिची सुटका करता आली. तिला पंजाबमधील रोपड येथील एका गावातून मुक्त करण्यात आले. या प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनीचे आईवडील शिक्षक आहेत. त्यांनी मुलीला मोबाईलसुद्धा दिला नव्हता. ती आजोबांच्या मोबाईलचा वापर करायची. तिला नवनवीन भाषा शिकण्याची आणि अ‍ॅक्टींगची आवड होती. ती सोशल मीडियावर ‘अ‍ॅक्टीव’ राहायची. दोन महिन्यांपूर्वी तिची जस्सी सिंग गिल नावाच्या एका बोगस आयडी चालवणाऱ्या व्यक्तीसोबत मैत्री झाली. कथित जस्सीने स्वत:ला पंजाबी सिंगर असल्याचे सांगितले. त्याने पंजाबी फिल्म आणि मनोरंजन इंडस्ट्रीशी जुळला असल्याचे सांगत तिलाही काम मिळवून देण्याचे आमिष दिले. विद्यार्थिनीने त्याच्याशी मैत्री केली. त्याने पंजाबला आल्यावर काम देण्याचे आमिष दिले. पीडित मुलगी त्याच्यासोबत जायला तयार झाली. ठरलेल्या योजनेनुसार जस्सी नागपूरला आला. त्याच्या इशाºयावरच ८ जुलै रोजी सकाळी विद्यार्थिनी बॅगची शिलाई करण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. जस्सी तिला रेल्वेने रोपडला घेऊन गेला.या दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याने चिंतेत पडलेल्या शिक्षक दाम्पत्यांनी तिचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्हीवरून मुलगी फरार झाल्याचे आढळून आले. त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.तिच्या फेसबुक अकाऊंटवरून जस्सी गिलसोबत ती रोपडला गेल्याची माहिती मिळाली. मुलीचे कुटुंबीय सामाजिक कार्यकर्ता अरविंदकुमार रतुडी आणि पोलिसांच्या चमूसोबत रोपडला पोहोचले. तेथील पोलिसांनी घटनेची माहिती देताच जस्सी फरार झाला. त्याची आई विद्यार्थिनीला घेऊन ठाण्यात पोहोचली. नागपूर पोलिसांनी विद्यार्थिनीला ताब्यात घेतले.सिंगर नव्हे बीअर शॉपीत करायचा कामरोपडला पोहोचल्यावर धक्कादायक बाब उघडकीस आली. जस्सी हा सिंगर नाही. पंजाबी संगीत व फिल्म इंडस्ट्रीशी त्याचा कुठलाही संबंध नाही. तो रोपड येथील एका बीअर शॉपीमध्ये काम करतो. त्याला दारु व मादक पदार्थाचे व्यसन आहे. तो मानव तस्करी करणाऱ्या टोळीशी जुळला असल्याचेही उघडकीस आले. रोपडमध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना विकणाऱ्या किंवा सौदेबाजी करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यामातून मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात. यासाठी त्यांच्याशी लग्नही करतात. जेव्हा पीडित मुलींचे कुटुंबीय त्यांच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्याशी सौदेबाजी करतात. मुलीचे कुटुंबीय गरीब असल्यास तिला देहव्यवसाय करणाऱ्यांना विकतात.

उडता पंजाबचे दर्शनविद्यार्थिनीचे कुटुंबीय आणि नागपूर पोलीस जेव्हा रोपडला पोहोचले. तेव्हा त्यांना उडता पंजाब या चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात नशेमुळे पंजाबचे कसे नुकसान होत आहे, ते दर्शविले आहे. रोपडमध्ये त्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणी बीअर शॉपी आणि नशेचे अड्डे दिसून आले. विद्यार्थिनीचा शोध घेत असतानाच अन्य तीन कुटुंबीयसुद्धा भेटले. ते सुद्धा पोलिसांसोबत आपल्या मुलींच्या शोधासाठी आले होते. यापैकी एका कुटुंबालाच त्यांची मुलगी सापडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया