शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीनेच केली दगाबाजी

By admin | Updated: July 6, 2014 00:55 IST

नेहमी घरी येणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीच्या घरातून पाच लाखांची रोकड तसेच अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी चोरीची घटना घडली.

पाच लाखांची रोकड अन् दागिने लंपास : चोरीचा गुन्हा दाखलनागपूर : नेहमी घरी येणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीच्या घरातून पाच लाखांची रोकड तसेच अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी चोरीची घटना घडली. फिर्यादी गौतम किसनराव भटकर (वय ३६) यांच्या पत्नी सुषमा यांची मैत्रीण नेहमी त्यांच्याकडे येत होती. ३ जुलैलासुध्दा ती सुषमाकडे आली. ती गेल्यानंतर सुषमा यांनी कपाट उघडून बघितले असता त्यातील पाच लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने (किंमत २ लाख, ४० हजार) दिसले नाही. सुषमा यांनी पतीला ही बाब सांगितली. नंतर भटकर दाम्पत्याने संशयित महिलेला विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे भटकर दाम्पत्याने सोनेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांकडे तक्रार जाणार असल्याचे कळताच आरोपी महिलेने भटकर दाम्पत्याविरुद्धच तक्रार करून त्यांना फसवण्याची धमकी दिली. सोनेगाव पोलिसांनी दोन्ही बाजू पडताळल्यानंतर आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिने चोरलेले सोने मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवल्याचे समजते. (प्रतिनिधी)