मैत्रिणीने लावला मित्रावरच बलात्काराचा आरोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:46 IST2018-02-01T16:43:16+5:302018-02-01T16:46:06+5:30

Girlfriend accused of raping a friend! | मैत्रिणीने लावला मित्रावरच बलात्काराचा आरोप !

मैत्रिणीने लावला मित्रावरच बलात्काराचा आरोप !

ठळक मुद्देसीताबर्डीत गुन्हा दाखल : आरोपी गजाआड

 




लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या  दिनेश बाबुलाल गांधी (वय ३०) याला सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.
आरोपी दिनेश वाडीतील कमलनगरात राहतो. तो विवाहित असून, फिर्यादी तरुणी अविवाहित आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी दिनेश हे दोघे आॅरिक्लेम मल्टिमार्केटिंग कंपनीत सोबत काम करतात. त्यामुळे त्यांच्यात २०१६ पासून मैत्रीपूर्ण संबंध होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये दिनेशने तरुणीला फोन करून सीताबर्डीतील इटर्निटी मॉलजवळ बोलवून घेतले. रात्री ७.३० च्या सुमारास ती मॉलजवळ येताच तिला आपल्या स्कॉर्पिओमध्ये बसवून फुटाळा तलावाकडे नेले. कारमध्येच तिच्यासोबत शरीरसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो नियमित तिला हॉटेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडू लागला. अलीकडे त्यांच्यात मतभेद झाले. ते वाढतच गेल्यानंतर तरुणीने बुधवारी सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करून दिनेश गांधीला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
कारमध्ये छायाचित्रण?
आरोपी दिनेश याची पत्नी त्या कंपनीत कामाला असून, तो तिच्या नावाखाली कंपनीत काम करायचा, असे समजते. दुसरे म्हणजे, फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपीने स्कॉर्पिओत पहिल्यावेळी शरीरसंबंध प्रस्थापित करताना छायाचित्रण करून ठेवले होते. ते दुसऱ्यांना दाखवण्याचा धाक दाखवून आरोपी दिनेश तिला वेळोवेळी बोलवून घेत होता. तर, प्रेमसंबंधातून हे सर्व घडल्याचे आरोपीचे मत आहे. ठाणेदार हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत चौकशी करीत आहेत.

 

Web Title: Girlfriend accused of raping a friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.