लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेच्या प्रांगणात जाऊन एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, तो मोटरसायकलवर बसून सुसाट वेगाने पळून गेला. शुक्रवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते.पीडित बालिका ११ वर्षांची आहे. एप्रिल महिन्यापासून एक आरोपी तिच्या मागे लागला आहे. शाळेत जाता-येताना तो तिचा पाठलाग करून तिला अश्लील हातवारे करून त्रास देतो. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो चांगलाच निर्ढावला. त्याने काही दिवसांपासून तिचा पाठलाग करतानाच आता शाळेच्या प्रांगणात जाऊन तिला छेडणे सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटत असताना त्याने असाच प्रकार केला. त्याच्या छळाला कंटाळलेल्या मुलीने आपल्या शिक्षकांना हा गैरप्रकार सांगितला. त्यामुळे शिक्षक तसेचकर्मचाऱ्यांनी त्या आरोपीकडे धाव घेतली. मात्र, तो मोटरसायकलने पळून गेला. या गैरप्रकारामुळे शाळा परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी पालकांना बोलावून त्यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यानंतर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.असाच गैरप्रकार अनेक मुलींच्या वाट्याला आला असून, सडकछाप मजनूच्या विकृत वर्तनामुळे मुलींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घरी आणि शाळेत सांगू शकत नाही आणि आरोपींचा छळ सहनही होत नाही, अशी स्थिती असल्यामुळे या मुली तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा तसा हा त्रास सहन करतात.कुठे आहे दामिनी पथकविशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी शाळा-महाविद्यालयीन मुलींना सडकछाप मजनूकडून त्रास होऊ नये म्हणून दामिनी पथकाचा उपक्रम सुरू केला होता. महिला पोलीस शाळा-महािवद्यालयाच्या परिसरात सतत तैनात राहून आरोपींच्या हालचालीवर नजर ठेवतील, असा त्या पथक निर्मितीमागे उद्देश होता. त्यासाठी या पथकातील महिला पोलिसांना दुचाकी आणि पेट्रोलचीही व्यवस्था करून दिली होती. मात्र, पथकातील दामिनी कानात ईयरफोन घालून मोबाईलमधील व्हिडीओ, फेसबुक आणि व्हॉटस्अॅपमध्येच गुंतल्या असल्याने शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात सडकछाप मजनूंकडून मुलींना छळण्याचे प्रकार सुरू आहे.
नागपुरात शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनीची छेड ; कुठे आहे दामिनी पथक ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:25 IST
शाळेच्या प्रांगणात जाऊन एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, तो मोटरसायकलवर बसून सुसाट वेगाने पळून गेला. शुक्रवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते.
नागपुरात शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनीची छेड ; कुठे आहे दामिनी पथक ?
ठळक मुद्देशिक्षकांनी घेतली धाव : आरोपी मोटरसायकलने पळाला